अखेर मान्सून केरळात दाखल; २-४ दिवसांत महाराष्ट्रात बरसणार - डिजिटल शेतकरी

अखेर मान्सून केरळात दाखल; २-४ दिवसांत महाराष्ट्रात बरसणार

मान्सूनबाबत हवामान खात्याचा अंदाज अखेर  खरा ठरला आहे. २९ मे रोजी मान्सूननं केरळात जोरदार पडणार आहे. IMD नुसार लवकरच  तारखेच्या ३ दिवसआधीच मान्सूननं केरळात हजेरी लावली आहे. त्यामुळे यंदा समाधानकारक चागला  पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता येणाऱ्या २-४  दिवसांत केरळसह कर्नाटक, महाराष्ट्रातही पावसाला सुरूवात होणार आहे.

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे बंगालच्या खाडीत आलेल्या चक्रीवादळामुळे वेळेपूर्वीच मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत  होती. वेळेपूर्वीच मान्सून १६-१७  मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहचला होता. वादळामुळे पावसाचे ढग वेगाने पुढे सरकत होते. २९ मे ते १ जून दरम्यान केरळमध्ये जोरदार हजेरी  पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर लक्षद्विपमध्ये ३० मे रोजी मुसळधार खूप  पाऊस पडू शकतो. मान्सूनपूर्वी केरळच्या विविध भागात जोरदार धो-धो  पाऊस कोसळला होता.

केरळमध्ये पुढील काही दिवस पावसाचे वातावरण असेच राहणार असल्याची शक्यता आहे. केरळमध्ये काही दिवस जोरदार पाऊस, वादळी वारे वाहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केरळमध्ये आज किमान २५-२७  डिग्री तर कमाल ३१-३२  डिग्री से. तापमान आहे. बिहार, झारखंडच्या अनेक भागात आज पावसाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. पुढील काही दिवस या राज्यात विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई परिसरातही सकाळपासून काही भागात रिमझिम कमी  जास्त  पाऊस पडत होता. अनेक भागात ढगाळ वातावरण असून याठिकाणीही पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

अधिक वाचा : सुर्यफुल लागवड माहिती 

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस बरसला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते व पुढील २ -३ दिसात हवामान बदलेल. कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ होताना दिसत आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या आसपास नोंदविण्यात आले.

Leave a Comment