अहमदनगरमध्ये झळकले औरंगजेबाचे पाेस्टर्स; उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल - डिजिटल शेतकरी

अहमदनगरमध्ये झळकले औरंगजेबाचे पाेस्टर्स; उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

नगर : अहमदनगरमधील फकीरवाड्यात( मुकुंद नगर) उरुसाच्या मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे पाेस्टर्स झळकल्याचा व्हिडिओ भलताच व्हायरल झाला आहे. मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन युवक नाचताना पाहायला मिळत आहे. याप्रकरणाची राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

तसेच दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर हे इथे मान्य केले जाणार नाही. या देशात, महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही”, असं फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना आदेश दिले आहे कि योग्य ती कार्यवाही करा.

Leave a Comment