आरे बापरे 'लोन अ‍ॅप' कंपन्यांची लूटमार; अवघ्या सहा दिवसाकरिता आकारले कर्जाच्या दुप्पट व्याज - डिजिटल शेतकरी

आरे बापरे ‘लोन अ‍ॅप’ कंपन्यांची लूटमार; अवघ्या सहा दिवसाकरिता आकारले कर्जाच्या दुप्पट व्याज

मार्केट मध्ये मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून काही मिनिटांत कर्ज देणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांकडून बँकिंग नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असून मनमानी व्याज आकारले जात पाहायला मिळत आहे. अशा कर्ज योजनांमध्ये अनेकांची फसवणूक होत असून कंपन्यांची बेसुमार लूट सुरु आपणास पाहायला मिळत आहे.मुंबई : कोणत्याही पेपरशिवाय कर्ज, काही मिनिटांत मिळेल कर्ज अशा प्रकारची आमिषे दाखवून कर्जदांरांची फसवणूक करणाऱ्या लोन अ‍ॅप कंपन्यांचा मुंबई सह  सुळसुळात वाढला आहे. लोन अ‍ॅप कंपन्यांची मनमानी पद्धतीने व्याज आकारणीचे अनेक  प्रकरण समोर आले आहे. ज्यात ३ हजार ८०० रुपयांच्या कर्जावर सहा दिवसांत चक्क ७००० रुपयांचे व्याज आकारल्या धक्कादायक प्रकार समोर पुडे  आला आहे. हे व्याज वसुलीसाठी फोटो माॅर्फ करुन सोशल मिडियावर बदनामी करण्याची धमकी वसुली एजंटने कर्जदाराला दिली होती. या प्रकरणी कुरार पोलीस स्टेशनमध्ये कंपनी विरोधात ग्राहकाने  तक्रार करण्यात आली आहे.सिंग यांना फेसबुक पेजवर ‘Hedisy Loan App’या लोन अ‍ॅपची लिंक जाहिरात वाचण्यात  आली. त्यावर क्लिक केल्यानंतर कंपनीनं लोन अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले असता . त्याने स्वताची कर्जाची पात्रता तपासण्यासाठी अ‍ॅप डाऊनलोड केले आणि आधार व पॅनकार्डचा तपशील सादर केला होता. मात्र कर्जासाठी कोणतीही मागणी केली नसताना त्यांच्या खात्यात ३,८०५ रुपये जमा झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर कंपनीने सहा दिवासांकरिता ७,००० रुपयांचे व्याज आकारले हे पाहुन धक्का बसला असल्याचे सिंग यांनी पोलीस  तक्रारीत म्हटलं आहे.कंपनीने व्याजाची रक्कम भरण्यासाठी त्रास देण्यासाठी अनेकदा काॅल केले. या वसुलीसाठी धमक्या देण्यात आल्या होत्या . माझा फोटो माॅर्फ करुन सोशल मिडियावर बदमानी करण्याची धमकी देण्यात आल्याचे सिंग यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

कर्ज देताना आमिषे अन् वसुलीसाठी गुंडांचा वापर

– लोन अ‍ॅप कंपन्यांकडून कर्जदारांची होणारी फसवणूक, वसुलीसाठी होणारा छळ अशा अनेक घटना अलिकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात  वाढल्या आहेत.

– कंपन्यांकडून कर्जदाराच्या सोशल मिडिया प्रोफाईलचा गैरवापर केला जाताना पाह्यला मिळत आहे.

– कर्जदाराचे फोटो माॅर्फ किवा सोसेल मिडिया  करुन बदनामी केली जाते.

– या कंपन्या तात्काळ कर्ज देत असल्या तरी त्यांच्या व्याजाचा दर हा प्रचंड प्रमाणात  आहे.

– तूर्त तरी या कंपन्यांना आवरणे कठिण झालेले दिसून येत आहे.

– विविध प्रकारची आमिषे दाखवून गरजूंना लोकांना  जाळ्यात ओढण्याचा प्रकार सध्या सुरु आहे.

– सायबर तज्ज्ञांनी अशा कोणत्यानी लोन अ‍ॅपला डाऊनलोड करु नये, असे आवाहन सरास  केले आहे.

Leave a Comment