उष्ण लाटेने विदर्भ होरपळला तर काही ठिकाणी पाऊस - डिजिटल शेतकरी

उष्ण लाटेने विदर्भ होरपळला तर काही ठिकाणी पाऊस

पुणे : मॉन्सूनचे आगमन काही दिवसांवर आले असतानाच, राज्यात उन्हाच्या चटक्यान काहिली वाढली दिसत आहे. उष्ण लाटेने विदर्भ अक्षरशः लाहीलाही झाली  आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची मोठ्या प्रमाणात नोंद झाली. ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर येथेही उष्ण लाट पाहायला मिळाली. आज शनिवार विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून नागालॅण्डपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्‍चिम सक्रिय होत आहे. पश्‍चिम बंगालपासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम स्तीतीत  आहे. तर ओडिशा किनारपट्टीलगत समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.७  किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या शिवाय अंदमान समुद्र आणि श्रीलंकेजवळ देखील चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती दिसत  आहेत.

राज्यात शुक्रवारी सकाळी आठपर्यंत पाऊस मिलिमीटरमध्ये ः सिंधुदुर्ग ः रामेश्‍वर ९०, वैभववाडी ५०, कोल्हापूर ः शिरोळ ५०, कोल्हापूर ४०, गगनबावडा व पन्हाळा प्रत्येकी ३० मिलिमीटर पावसाची विविध भागात  नोंद झाली. सांगलीच्या कसबे डिग्रजला ३० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मॉन्सूनने ईशान्य भारत व्यापला

नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) गोव्याच्या दारात पोहोचले आहेत. मात्र पुढील वाटचालीस पोषक हवामान नसल्याने अरबी समुद्रावरून मॉन्सूनची प्रगती थोडीशी मंदावली थांबली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी वाट काही दिवस पाहावी लागणार आहे. बंगालच्या उपसागरावरून मात्र मॉन्सूनची आगेकूच सुरू असून, संपूर्ण ईशान्य भारत व्यापून, सिक्कीम आणि पश्‍चिम बंगाल राज्याच्या काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान िभागाने वर्तविले   आहे.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गोंदिया इतर काही भाग.

Leave a Comment