सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी गावातील एका शेतकऱ्याने केशर आंब्याच्या बागेतून लाखोंचा नफा मिळवलाय आहे. तीन एकर शेतीत केशर आंब्याच्या माध्यमातून केदारनाथ बिराजदार यांनी तब्बल आठरा लाखाचा नफा हा केशर आंब्यातून कमवलाय. विशेष म्हणजे अवघ्या तीन वर्षात त्यांनी आंब्याचे (Mango) पीक घेतले असून त्यांचा केशर आंबा परदेशात निर्यात करण्यात आल्याची माहिती हि शेतकऱ्याने मध्यमातून दिली. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिकता अवलंबून फळबागेकडे वळा आणि भरघोस उत्पन्न मिळवा.
दहा हजाराची नोकरी करत नोकर बनण्यापेक्षा स्वतः मालक म्हणून शेती करा आणि नफा मिळवा असे आवाहन दक्षिण सोलापूर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी केदारनाथ बिराजदार यांनी तरुण पिढीला केले आहे. केदारनाथ बिराजदार यांनी माळरानावरील तीन एकरावर केशर आंब्याची लागवड करून आंबा बाग उभी केली होती.
‘अकेले देवेंद्रनेच तुमच्या तिघांचाही धूर काढलाय’
तीन वर्षात आंब्याच्या झाडाला फळ लागले असून त्यातून खर्च 2 लाख वजा जाता त्यांना 18 लाख रुपयांचे उत्पन्न खरघोष मिळाले आहे. चांगले दर्जेदार आंब्याचे उत्पन्न त्यांनी घेतल्याने त्यांच्या आंब्याला परदेशातून मागणी हि आली होती आहे. तरुण मित्रांनी नोकरीच्या मागे न लागता फळबाग शेतीकडे वळून प्रगती साधावी असे आवाहनही त्यांनी तरुण शेतकऱ्यांना यातून केले आहे.