खाद्यतेल २० रुपयांनी स्वस्त होणार 2022 - डिजिटल शेतकरी

खाद्यतेल २० रुपयांनी स्वस्त होणार 2022

नवी दिल्ली : खाद्यतेल गुरुवारी ब्रँडेड खाद्य तेल उत्पादकांनी पाम, सूर्यफूल आणि सोयाबीन खाद्यतेल किमतीत २० रुपयांपर्यंत कपात करण्याची  घोषणा केली  गेली आहे. खाद्यतेल आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत किमतीही कमी करण्याचा निर्णय खाद्य तेल उत्पादकांनी  घेण्यात आला  आहे.खाद्य तेल उत्पादन करणाऱ्या सर्वच मोठ्या कंपन्यांनी किमती कमी केल्या जाणार  आहेत. अदाणी विलमर, रुची सोया, जेमिनी एडिबल्स ॲण्ड फॅट्स इंडिया, मोदी नॅचरल्स, गोकुल री-फॉयल ॲण्ड सॉल्वंट, विजयसॉल्वेक्स, गोकुळ ॲग्रो रिसोर्सेस आणि एन. के. प्रोटीन तेलाचा  यांचा  त्यामध्ये समावेश आहे.  सूत्रांनी सांगितले की, किमती कमी झाल्यामुळे तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ क्षेत्रातील महागाईही त्यामुळे कमी होईल. खाद्य तेल व स्निग्धांश श्रेणीतील महागाई मेमध्ये १३.२६ % वर होती. अदाणी विल्मरचे एमडी अंगशु मलिक यांनी सांगितले की, सरकारच्या सूचनेनुसार तसेच ग्राहकांच्या हितासाठी आम्ही खाद्य तेलाच्या किमतीत कपात करत आहोत आणि  नवीन एमआरपी असलेले तेल पुढील आठवड्यात बाजारात येईल.

दोन कारणांमुळे किमती झाल्या कमी?

सरकारने कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात कपात केल्यामुळे तेलाच्या किमती कमी करण्यास कंपन्यांना   मोठी मदत झाली आहे.

मागील काही आठवड्यांपासून अर्जेंटिना आणि रशिया यासारख्या प्रमुख निर्यातदार देशांनी सूर्यफूल तेलाचा पुरवठा सुरू केला होता . त्यामुळे किमती आणखी कमी होण्यास मदत झाली आहे.

 

तेल स्वस्त

पामतेल ७ ते ८ रु.

सूर्यफूल १० ते १५

सोयाबीन ५ रुपये

७०%

सूर्यफूल तेलाची विक्री ही दक्षिण राज्ये आणि ओडिशामध्ये जास्त होते.

१.३

कोटी टन खाद्य तेल भारत दरवर्षी आयात करत असतो.

६०%

एवढ्या प्रमाणात आपण आयात केलेल्या खाद्य तेलावर अवलंबून होतो.

काय होती समस्या

मागील एक वर्षात खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती आहे. हा सरकारसाठी चिंतेचा विषय बनला  आहे. जागतिक बाजारातील दरवाढीमुळे किमती वाढतच चालल्या  होत्या.

हैदराबादमधील जेमिनी एडिबल्स ॲण्ड फॅट कंपनीने गेल्या आठवड्यात फ्रीडम सूर्यफूल तेलाच्या एक लिटर पाऊचची किंमत १५ रुपयांनी कमी करून २२० रुपये केली गेली होती. आता २० रुपयांची कपात होऊन किंमत २०० रुपये होईल.

Leave a Comment