आपण सतत तक्रारी का करतो, सतत नाखूष असतो? दिवसभरात काहीच चांगलं घडत नाही? 2022 - डिजिटल शेतकरी

आपण सतत तक्रारी का करतो, सतत नाखूष असतो? दिवसभरात काहीच चांगलं घडत नाही? 2022

नेहमी सकारात्मक विचार करा, सगळं चांगलं होईल असं सतत सांगणारी(नाखूष), सल्ला देणारी माणसं सारखी आपल्या जीवनात कोणी न कोणी भेटत असतात. आजूबाजूला एवढ्या विचित्र, मनाला अस्वस्थ करणाऱ्या,ताण येणाऱ्या गोष्टी घडत असताना सतत सकारात्मक विचार करणं एवढ सोपं नाही.

ते कसं जमावं? पण मग निदान आपलं तक्रार करणं तरी कमी होईल का पहा?

आपल्या रोजच्या दिवसाचे नीट निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येते, की आपण सतत कायम कोण न कोणाविषय तक्रार करत असतो. जसं की, कोकिळा एवढ्या किंचाळतात ना झोपच नीट झाली नाही, छे, काय गरम होतं आहे, आजकाल अजिबात थंडी पडत नाही, भाज्या नीट मिळत नाहीत, सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टीबाबत आपली काही ना काही कायम तक्रार असते.(नाखूष) कशात काही अर्थ नाही असं आपल्याला वाटत राहतं आणि  आपलं वाटणं खरं असेल/असतं, पण त्यामागे असतं आपलं असमाधान च कारण. प्रत्येक गोष्टीत आपल्याला मिळालं त्यापेक्षा जास्त हवं असतं आपल्या अपेक्षा वाढत जाणे

नाखूष

यावर उपाय म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणीने एक खेळ खेळून पाहिला आहे. ‘तक्रार ओळख’ म्हणून… आम्ही दोघींनी तो दिवस एकत्र घालवत होतो. मी म्हणाले की, काय हा आवाज? की ती पटकन म्हणणार, तक्रार. तिने म्हटलं की नीट जेवणच झालं नाही, तर मी लगेच म्हणणार “तक्रार. हळूहळू आमच्या अशा खूप तक्रारी दिवसभरात गोळा झाल्या होत्या. ज्या एरवी आमच्या आम्हांला कळल्या नसत्या आणि  आम्ही मनातून किती असमाधानी होतो. आमच्याजवळ अनेक गोष्टी असूनही हे आमच्या लक्षातच आलं नसतं.

या तक्रार ओळखीच्या खेळामुळे आमचं असमाधान आम्हांला कळलं आणि आमचं आम्हांलाच हसू आलं होत . शिवाय आम्ही एकमेकींच्या तक्रारींकडे ती काही तक्रार नाही, ते एक वास्तव आहे हे सांगताना खूप हसत होत होतो… म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे हसून बघण्याची कला आम्ही साधू शकत होतो आणि  तुम्ही खेळून पाहा हा खेळ.

हे हि वाचा : हाता-पायांमध्ये येणाऱ्या झिणझिण्यांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या कशामुळे होते ही समस्या!

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment