पंतप्रधान मोदींना 'पृथ्वीराज' सिनेमा दाखवणार का? अक्षय कुमारने दिलं खूप  मजेदार उत्तर - डिजिटल शेतकरी

पंतप्रधान मोदींना ‘पृथ्वीराज’ सिनेमा दाखवणार का? अक्षय कुमारने दिलं खूप  मजेदार उत्तर

अक्षय कुमार चा हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित ‘पृथ्वीराज’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत मध्ये  दिसणार आहे. या सिनेमात पृथ्वीराज चौहान यांच्या साहसाची पट कथा दाखवली जाणार आहे. सिनेमाबाबत आधीच फॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात  क्रेझ निर्माण झाली आहे, नुकताच या सिनेमाच ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.एका ग्रॅन्ड इव्हेंटमध्ये नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. यावेळी अक्षय कुमार याला विचारण्यात आले की, हा सिनेमा रिलीज झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिनेमा  दाखवणार का? यावर उत्तर देत अक्षय कुमार म्हणाला की, मी काय दाखवणार. जर त्यांना बघायचा असेल तर ते स्वत: बघतील आणि मी कोण होतो त्यांना सिनेमा दाखवणारा. अक्षयच्या या उत्तरावर उपस्थित लोक हसले.तसेच अक्षय कुमार म्हणाला की, या सिनेमाचा भाग झाल्याने तो स्वत:ला लकी मानत आहे. इतक्या मोठ्या योद्ध्यावर सिनेमा केल्याने अक्षय कुमार खूप  आनंदी आहे. अक्षय कुमार म्हणाला की, मला या इंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. इतका मोठा ऐतिहासिक सिनेमा मी या आधी  कधी केला नाही. जेव्हा मला समजलं की इतकी मोठी भूमिका करायची आहे ती माझ्या ती गर्वाची बाब आहे,असं वाटतंय जीवन सफल झालं असा अक्षय कुमार म्हणाला.या सिनेमात पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनातील दोन महत्वाच्या  घटना दाखवल्या जाणार आहे. अक्षय कुमार त्यांची कथा पडद्यावर रेखाटणार किवा त्याचा प्रयत्न करणार  आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत मानुषी छिल्लर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्त आणि सोनू सूद यांच्याही यात महत्वाची  भूमिका आहेत. ३ जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे आहे.

Leave a Comment