पूर्वमोसमी ला पोषक हवामान पाऊस बरसणार 2022 - डिजिटल शेतकरी

पूर्वमोसमी ला पोषक हवामान पाऊस बरसणार 2022

पूर्वमोसमी उष्ण लाटेने विदर्भ होरपळत असतानाच राज्यात पूर्वमोसमी पावसाल पोषक हवामान निर्माण होत आहे. पूर्वमोसमी ढगाळ हवामानासह उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. ७ मंगळवार ) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने वर्तविला  आहे. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी, गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हि  झाली. तर वर्धा, नागपूर येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, अकोला, अमरावती येथे ४४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंदवली  आहे. राज्यातही उन्हाचा चटका कायम असून, उकाडा चांगलाच वाढत चालला  आहे.

पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला  आहे. तर पूर्व उत्तर प्रदेशापासून बांगलादेशापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय  निर्माण आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती असून, त्यापासून श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे आणि  आज (ता. ७ मंगळवार ) विदर्भात उष्ण लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी वारा  पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोकणातील मॉन्सून आगमनाचा मुहूर्त टळणार

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग व्यापून गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल मंदावली  थांबली आहे. प्रवाह मंदावल्याने महाराष्ट्रातील मॉन्सूनचे आगमनही लांबत चालले  आहे. साधारणतः ७ जून रोजी मॉन्सून तळ कोकणात दाखल होत कायम  असतो. मात्र यंदा मॉन्सूनच्या आगमनाचा मुहूर्त टळणार आहे असे दिसून येत आहे. यातच संपूर्ण ईशान्य भारतासह सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्याच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल झाल्यानंतर या भागातही मॉन्सूनची वाटचाल बरीच  थांबली आहे.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गोंदिया.

वादळी पावसाचा इशारा :

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी वादळी पाउस पडणार आहे असा अंदाज आहे.

मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी वादळी पाउस पडणार आहे असा अंदाज आहे.

 

1 thought on “पूर्वमोसमी ला पोषक हवामान पाऊस बरसणार 2022”

  1. मानसून विषयी ची अत्यंत उपयोगी माहिती आहे

    Reply

Leave a Comment