बकऱ्याचा बळी देताना ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू , गावात शोककळा 2022 - डिजिटल शेतकरी

बकऱ्याचा बळी देताना ३ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू , गावात शोककळा 2022

झारखंडच्या गुमला जिल्ह्यातून एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. दुर्गा पुजेसाठी बकऱ्याचा बळी देत असताना लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना दसर्याला  घडली आहे. नवमीच्या मुहूर्तावर बकरं बलिदान देण्याची प्रथा येथे असते. त्यानुसार, बकरं बलिदान देत असताना बळी देण्यात येणाऱ्या हत्याराचा तुकडा कट होऊन तीन वर्षांच्या चिमकुल्याला लागला होता. त्यामुळे, तो लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता आणि या दुर्घटनेत चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला आहे.

हे हि वाचा : जागतिक दूग्ध व्यवसाची उलाढाल सर्वाधिक जगातील बलाढ्य कंपन्यांपेक्षाही दुधाची बाजारपेठ मोठी

बकऱ्याचा बळी देतानाच्या हत्याराचा तुकडा उडून चिमुकल्यास लागला होता आणि त्यानंतर, त्या मुलास रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनं परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे तर, लहान मुलाच्या आई-वडिलांना टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या अगोदर नवमीला बकरं बलिदान देण्यात येतं असते. गुमला जिल्ह्यातील एका गावात दुर्गापुजेत बकऱ्याचा बळी देण्याची प्रथा येथे आहे. त्यानुसार, दोन बकऱ्यांचा बळी देण्यात आला होता आणि मात्र, तिसऱ्या बकऱ्याचा बळी देत असताना हत्याचा तुकडा तुटला आणि जवळच उभा असलेल्या दिपक उरांव यांच्या ३ वर्षीय चिमुकल्यास लागला होता. त्यानंतर, काही वेळांतच लहानग्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

हे हि वाचा : कांदा, लसूण उत्पादक तोट्यात

तुम्हाला हि डिजिटल शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा या ग्रुप वर फक्त शेती विषयक चर्चा करता येतील वारसा शेतकरी जोडण्याचा

Leave a Comment