केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह व ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटाला मिळालेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
🧐 शिवसेना कुणाची, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पार पडली. ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये निकाल आपल्या बाजूने राहावा यासाठी प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. आता ठाकरे गटाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
👉 केंद्रीय निवडणूक आयोगातील लढाईत शिंदे गटाविरुद्ध उद्धव ठाकरे गटाचा पराभव झाला आहे. त्यांच्या हातून आता पक्षाचे ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह देखील शिंदे गटाला गेले आहे. एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी 40 आमदारांसह वेगळे होत ‘आम्हीच खरी शिवसेना’ असल्याचं सांगितलं होतं. यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली, पण आता कायदेशीर म्हटलं तर शिंदे-ठाकरे गटातील शिवसेना पक्ष व पक्षचिन्हाबाबतचा वाद आज संपला आहे.
हे हि वाचा : अतिक्रमण केलेली जमीन मिळणार परत कशी मिळवाल