मिरी / भगवा झेंडा हा धर्माचेे आणि संस्कृतीचे प्रतीक असून छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी घालून दिलेल्या धर्म कार्याचे प्रतिक म्हणजे भगवान झेंडा असून राजकार णी या भगव्या झेंड्याच्या नावाखाली देखील राजकारण करत असल्याचं मोठ दुर्दैव आहे धर्म आणि संस्कृतीशी एकनिष्ठ राहणाऱ्या विचारासोबत तरुणांनी जावे असे आवाहन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने दि.14 मे रोजी सायं आयोजीत करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी हिंदू राष्ट्र सेना अध्यक्ष धनंजयभाई देसाई, कालीचरण महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. नगर जिल्ह्यातील अकोले येथील महामुनी अगस्तीऋषी महाराज आमचे गुरुस्थान असून अहमदनगर ऐवजी अगस्तपुर असे नामकरण नगरचे होण्याची गरज असल्याचे म्हणत न्यायव्यवस्था ज्या प्रमाणे आरोपीकडून पूर्वी घडलेल्या आरोपाची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच आरोपीला शिक्षा ठोठावते त्या पद्धतीने मागील इतिहास पाहूनच धर्मकार्यासाठी पुढे चालण्याची गरज असल्याचे म्हणत इतिहास दडपून टाकण्याचा काही लोकांना कडून प्रयत्न होत असून हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचा आहे तो कोणीही पुसून टाकू शकत नाही असे कालीचरण महाराज म्हणाले. हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजयभाई देसाई म्हणाले धर्मकार्यासाठी जो प्रामाणिकपणे आपली भूमिका व्यक्त करतो त्याला नेहमीच त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे राजकारणी आता देवांचे ही बाप काढायला लागलेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या कार्यकाळात अठरापगड जाती धर्माचे लोक त्यांनी सोबत घेतले म्हणून त्यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करता आले या देशाचे रक्षण नाथ संप्रदायाने देखील केले असून अहमदनगर जिल्हा नाथांची भूमि आहे राज्यात अनेक गड उभे राहिले परंतु रायगडाच्या पायथ्याशी आकाश महाराज भोंडवे यांनी अन्नछत्र उभारून धर्म कार्याचे महती दुगुनीत केली.यावेळी धर्म व समाज कार्य करणाऱ्या काही व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. धर्मभूषण पुरस्कार राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे, शिवाजी महाराज देशमुख,संतचरण छगन महाराज मालुसरे, रायगड शिवचरित्रकार आकाश महाराज भोंडवे, दीपक महाराज काळे यांच्यासह समाज भूषण पुरस्कार जयहिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पालवे, माजी सरपंच अनिल गीते, आदिनाथ दहिफळे, डॉ. संदीप गाडे, डॉ. संतोष गीते, डॉ. अमोल जाधव, कडुबाळ महाराज गव्हाणे, अक्षय बोराडे,जयंत मोटे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या जयंतीचे आयोजन डॉ. बबनराव नरसाळे, डॉ. अमोल नरसाळे यांनी केले होते. यावेळी माजी सभापती संभाजी पालवे, माजी सरपंच संतोष शिंदे, कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष अशोक झाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
