पुणे- इलेक्ट्रिक गाडी इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक बसेस नंतर, आता आपण लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रक लाँच करणार आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. काल ते पुणे येते आले असता ते काल पुण्यात राज्यस्तरीय साखर परिषद 2022 ला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी पर्यायी इंधनाचा वापर आणि महागाईच्या युगात त्याचे महत्त्वही यावरही त्यांनी भाष्य केले.
पर्यायी इंधन उर्जेचे नवीन भविष्य –
पुणे येथे या राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी गडकरी यांनी इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाच्या वापरावर भर दिला आहे. गडकरी म्हणाले, इथेनॉलचा वापर शेती आणि उपकरणांमध्ये कशा पद्धतीने करता येईल, याचा प्रयत्न हा पूर्ण केला जात आहे. एवढेच नाही, तर पर्यायी इंधन हे ऊर्जेचे नवे भविष्य असल्याचेही ते या वेळी बोलतानी म्हणाले.
इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढतेय –
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, इथेनॉल आणि मिथेनॉलसारख्या पर्यायी इंधनांसोबतच इलेक्ट्रिक, हेही भविष्य खूप आहे. मला चांगले आठवते, की 3 ते साडेतीन वर्षांपूर्वी मी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल बोलत होतो, तेव्हा लोक मला अनेक प्रश्न विचारायचे. पण आता बघा, इलेक्ट्रिक-वाहनांना प्रचंड मागणी बाजारात आहे आणि ती झपाट्याने वाढत आहे. एवढेच नाही, तर कार आणि बसेसनंतर आता आपण लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रकही लाँच करणार आहोत, असेही गडकरी यांनी बोलताना म्हटले आहे.