नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानाला मुकावे लागणार कोर्टाने दिला दणका - डिजिटल शेतकरी

नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानाला मुकावे लागणार कोर्टाने दिला दणका

मुंबई : आज  विशेष पीएमएलए न्यायालयाने महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दणका हा न्यायालयाने  दिला आहे. उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज मलिक आणि देशमुख यांच्यावतीने करण्यात आला होता. परंतु कोर्टाने हा अर्ज नाकारला त्यामुळे उद्याच्या मतदानातनवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना सहभाग घेता येणार नाही हे पष्ट झाले आहे.राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस  धुमाकूळ निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने ३, शिवसेनेने २, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक-  उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे आणि  या निवडणुकीत सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत होणार आहे. उद्या  १० जूनला मतदान होणार असून तत्पूर्वी कुठलाही घोडेबाजार होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्ष विशेष खबरदारी घेतना दिसून येत  आहे. या निवडणुकीसाठी १ मतही महत्त्वाचे असल्याने महाविकास आघाडीची २ मते बाद झाल्याने मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी मविआ नेत्यांना आणखी कसरत घावी लागणार आहे.

Leave a Comment