मिरी / पाथर्डी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या मिरी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी यांच्या सौभाग्यवती सुनंदा गवळी यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदाची निवडणूक पार पडली यामध्ये सत्ताधारी गटाकडून सुनंदा गवळी यांनी अर्ज दाखल केला तर विरोधी गटाकडून अलका जगन्नाथ कोरडे यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुनंदा गवळी यांना आठ मते मिळाली तर अलका कोरडे यांना सहा मते मिळाली. विरोधी गटाच्या ग्रा प सदस्य शशिकला सोलाट मात्र अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले. यावेळी उपसरपंच अँड अरुण बनकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गवळी, संजय शिंदे, अनिता गवळी ,अनिता गुंड, संभाजी झाडे, श्रीमती कमल सोलाट, युवानेते आदिनाथ सोलाट, संजय शिंदे, जालिंदर गवळी, विजय गुंड, अशोक दहातोंडे, अशोक गवळी, गणेश जाधव, अशोक घोंगडे, नामदेव सोलाट, बद्री सोलाट, राजेंद्र वाघ, बंडू झाडे, गवळी, शिवाजी गवळी, जालिंदर नवल, बाबासाहेब निमसे, साईनाथ कोरडे, जालिंदर झाडे, नंदकुमार पाटील, जगन्नाथ वेताळ, अशोक शेळके, नंदू बनकर, सोमनाथ झाडे, चेअरमन विष्णू सोलाट, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शेख आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रीती मनाळ, ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांनी काम पाहिले.