मोठी बातमी :  शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर पहा कोणाला कोणते मंत्री पद भेटले 2022 - डिजिटल शेतकरी

मोठी बातमी :  शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर पहा कोणाला कोणते मंत्री पद भेटले 2022

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला होता. मंत्री त्यानंतर खातेवाटप कधी होणार आणि कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं दिलं जाईल याबाबत खूप चर्चा सुरू होत्या आणि दरम्यान, मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप रविवारी जाहीर केले आहे.

खातेवाटपानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभागांची जबाबदारी असणार आहे आणि  तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असणार आहे.

अन्य  मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत ते पहा:

राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास हे खात मिळल आहे.

सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय हे खात मिळल आहे.

चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य हे खात मिळल आहे.

डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास हे खात मिळल आहे.

गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण हे खात मिळल आहे.

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता हे खात मिळल आहे.

दादा भुसे- बंदरे व खनिकर्म हे खात मिळल आहे.

संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन हे खात मिळल आहे.

सुरेश खाडे- कामगार हे खात मिळल आहे.

संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन हे खात मिळल आहे.

उदय सामंत- उद्योग हे खात मिळल आहे.

प्रा.तानाजी सावंत– सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण हे खात मिळल आहे.

रवींद्र  चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण हे खात मिळल आहे.

अब्दुल सत्तार- कृषी हे खात मिळल आहे.

दीपक केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा हे खात मिळल आहे.

अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण हे खात मिळल आहे.

शंभूराज देसाई– राज्य उत्पादन शुल्क हे खात मिळल आहे.

मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास हे खात मिळल आहे.

 

हे हि वाचा : कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंट शिवीगाळ, धमकी देत असेल तर घाबरु नका, RBI चा नवा आदेश काय आहे वाचा

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment