एकरी ५० क्विंटल कापूस ‘अमृत पॅटर्न’ पहा - डिजिटल शेतकरी

एकरी ५० क्विंटल कापूस ‘अमृत पॅटर्न’ पहा

कापसाच्या शेतीसाठी साधारणपणे ३० हजार रुपयांचा खर्च येत असतो. परंतू, उत्पन्न देखील जवळपास तेवढेच मिळत असते. त्यामुळे कापसाची शेती तोट्याची होत आहे आणि  परंतु, याच खर्चामध्ये आणखी २० हजार रुपयांनी वाढ केल्यास आणि अमृत पॅटर्नने कापसाची लागवड केल्यास त्यापासून शेतकरी किमान दोन लाख  रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतात आणि  ते यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने शक्‍य करुन दाखविले आहे.

अमृत देशमुख मु.पो.आंबोडा महागाव जिल्हा यवतामळ असे अमृत पॅटर्न विकसीत करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे आहे. देशमुख यांच्याकडे १२ एकर शेती आहे आणि  यात ते कापूस, सोयाबीन, तूर, भूईमूग, ऊस आदी पिकांची लागवड करतात. गेल्या पाच वर्षांपासून कापसासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत आणि  मागील वर्षी त्यांनी ४ एकरवर ७१५१ व राशी ६५९ या प्रजातीच्या कापसाची लागवड केली होती.पंरतु, ती पांरपारिक पध्दतीने न करता स्वत:च लागवड पध्दत विकसीत केली आणि  त्या पध्दतीला अमृत पॅटर्न असे नाव दिले. कापसाची लागवड करताना त्यांनी पट्टा पद्धतीने उत्तर दक्षिण अशा स्वरूपात केली होती . रासायनिक आणि शेण खताचा वापर केला होता . एकाचवेळी खताची मात्रा न देता दहा ते पंधरा दिवसांच्या अंतरावर त्याने दिले आहे.

उत्तर-दक्षिण पद्धतीने झाडांची लागवड केल्याने भरपूर सूर्यप्रकाश मिळून झाडांची चांगली वाढ झाली होती. शिवाय झाडांना भरपूर फांद्या फुटल्याने बोडांची संख्या वाढली आणि  कापसाच्या झाडांना बांबू आणि ताराचा आधार देण्याचा प्रयोग प्रथमच केला आहे एक एकर लागवडीचा खर्च ५० हजार रुपये आला होता.

अमृत पॅटर्नमुळे त्यांनी एकरी ५१ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले आहे आणि  सर्व खर्च जाता एकरी दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे. देशमुख यांच्या प्रयोगाची कृषी विद्यापीठाने दखल  घेतली. त्यांना विद्यापीठात बोलावून एकरी ५१ क्विंटल कापसाचे उत्पादन घेण्याचे तंत्र, पट्टा पध्दती आणि अमृत पॅटर्न समजून घेतला आहे. कापूस उत्पादकांनी या पध्दतीचा अवलंब करुन चारपैस अधिकचे मिळविणे शक्‍य असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी अवलंब करावा

महाराष्ट्र तील शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांनी अमृत पॅटर्नचा अवलंब करावा,. गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील  शेतकरी देशमुख यांच्या शेताला भेट देऊन माहिती घेत आहेत.

Leave a Comment