Animal Sellection: नवीन जनावर खरेदी करताय? मग ही माहिती लक्षात ठेवा - डिजिटल शेतकरी

Animal Sellection: नवीन जनावर खरेदी करताय? मग ही माहिती लक्षात ठेवा

Animal Sellection: तुम्हाला जर उत्तम पशुपालक व्हायच असेल तर आधी तुम्हाला उत्तम जनावरांची निवड (Animal Sellection) करता हि आली पाहिजे. नविन जनावर विकत घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागत असतो.

आपल्या भागातील वातावरणात कोणत्या जातीचे जनावर राहू शकेल याचा आधी विचार करावा लागतो. जनावर खरेदी (Animal Buying) करताना पूर्व नोंदीवरून, बाह्य गुणावरून आणि प्रत्यक्ष दर्शनीय गुणावरून दुधाळ जनावराची निवड करावी आणि जनावरांचे वय तसेच सरासरी उत्पादन क्षमता यावरून जनावरांची निवड करणे सोयीचे होत असते. यासाठी मात्र जनावरांच्या नोंदणी असणं फार आवश्यक आहे. जनवरांच्या बाह्य अंगावरुन जनावरांची उत्पादन क्षमता लक्षात येत असते.

हे हि वाचा : आता वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी लागणार फक्त 100 रुपये फक्त दोन दिवसात

Animal Sellection जनावरांची नोंद नसल्यास दुधाळ जनावरांच्या लक्षणावरून त्यांची निवड करता येते आणि त्यासाठी जनावरामध्ये कोणती ठळक लक्षणे पाहावीत याची माहिती आज पाहुया. जनावरांची छाती जर अधिक रुंद असेल तर रक्ताभिसरण अधिक होते म्हणजे असे जनावर शेतीकामासाठी सक्षम आहे असे समजावे तसेच अशा गायींच दूध उत्पादनही चांगले असते.

जनावरांचे मागील दोन पायातील अंतर अधिक असल्यास जनावराच्या कासेच्या वाढीसाठी भरपूर जागा मिळते आणि गर्भाशयाचा आकार वाढल्याने गर्भाची वाढ भरपूर होते व वासराच्या जन्माच्या वेळी वजन जास्त असते. त्यामुळे वासराच्या मरतुकीचे फार प्रमाणही कमी होते.

– भाकड जनावर खरेदी करत असाल तर त्याच्या कासेवर कातडीच्या घड्या असाव्यात म्हणजे जनावर दुधावर असल्यास त्याची कास किती मोठी होऊ शकते याची कल्पना येत असते.

– दुधाळ जनावरांना खालच्या पोटाच्या बाजूने बघितल्यास एक मोठी शीर दिसते तिला दुधाची शीर असे म्हणतात. ही जितकी जाड व वळणावळणाची असेल तितके जनावर जास्त दूध देणारे समजले जावे.Animal Sellection

– दुधाळ जनावरांना मागील दोन्ही पायाच्या बाजूने बघताना कासेचा त्रिकोणी भाग जितका ठळकपणे दोन्ही पायातून दिसेल तितके दुधाळ जनावर समजण्यात यावे.

वरील सर्व व्यावसायिक बाबी लक्षात घेता जातीवंत जनावरे आपल्या गोठ्यात निर्माण करणं हाच एक सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे आणि याकरिता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वंश हरविलेल्या गाई म्हशींच ग्रेडिंग तंत्रज्ञानानुसार वर्गीकरण करावं.

अधिक दूध उत्पादन करणाऱ्या देशी गायी आणि म्हशीच्या जातीपासून कृत्रिम रेतनाद्वारे कृत्रिम रेतन केल्यास तो एक शाश्वत पर्याय ठरू शकत आहे.

याकरिता आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन गाईच्या गिर, साहिवाल, देवणी आणि म्हशीच्या मुऱ्हा, मेहसाना, सुरती जातींचे रेतन उपलब्ध करून घेत आपल्या जनावरांपासून भविष्यातील चांगल्या कालवडी निर्माण करता येणार आहे.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment