अंजन औषध वनस्पती(Anjan medicinal plant) 2023 - डिजिटल शेतकरी

अंजन औषध वनस्पती(Anjan medicinal plant) 2023

अंजन (Anjan medicinal plant)हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून याचे शास्त्रीय नावहार्डविकिया बायनॅटा हे नाव  आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोटी कुलामधील सीसॅल्पिनिऑइडी उपकुलातील वनस्पतींप्रमाणे  सारखी आहे. भारत, मलेशिया, थायलंड, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणिस्तान-श्रीलंका  इत्यादी देशांत हा आढळतो. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांतील वनांत हा वृक्ष  जास्त आढळतो.

Anjan medicinal plant अंजन हा पानझडी वृक्ष असून सुमारे ३०  – ३५ मी. उंचीपर्यंत वाढतो. त्याच्या खोडावर साधारणपणे ९  – १५ मी. उंचीपासून पुढे अनेक आडव्या फांद्या फुटतात आणि  पाने लांब देठाची, एकाआड एक असतात. ती संयुक्त प्रकारची असून ३ -६ सेंमी. लांब आणि २-४  सेंमी. रुंद असतात. पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास ऑक्टोबर ते जानेवारीत लहान, हिरवट-पिवळ्या रंगाच्या असंख्य फुलांचा फुलोरा येत असतो. या वृक्षाच्या शेंगा ७  – ९ सेंमी. लांब, चपट्या, पातळ, लवचिक असते.(Anjan medicinal plant)

शेंगा दोन्हीकडे टोकदार असून त्यामध्ये फक्त एकच  बी हि  असते आणि  ती टोकाकडून बाहेर पडते. अंजन या वृक्षाचा पाला गुरे खात असतात. अंजनाचे लाकूड टिकाऊ, जड, टणक असल्यामुळे घरबांधणी, शेतीची अवजारे, पुलांचे बांधकाम आणि कातीव व कोरीव कामास वापरले जाते असते. अंजनाचा डिंक, मुळांचा चीक आणि पानांचा रस यांचा उपयोग प्रमेहावर (गुप्तरोगावर) औषध म्हणून उपोयोग  केला जातो. तसेच शोभिवंत वृक्ष म्हणूनही या वृक्षाची लागवड फार  केली जाते.(Anjan medicinal plant)

हे हि वाचा : अडुळसा वनस्पती

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment