अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा 15 लाख रुपये, नरेंद्र पाटलांची माहिती( interest repayment scheme) - डिजिटल शेतकरी

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा 15 लाख रुपये, नरेंद्र पाटलांची माहिती( interest repayment scheme)

मराठा समजला होणार फायदा

मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक (interest repayment scheme) मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाखांवरून आता १५ लाख करण्यात आल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच, वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची अट ६० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहितीही नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. interest repayment scheme

नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच पहिल्या दिवशी राज्यातील ३ हजार ७२७ लाभार्थ्यांना २ कोटी ९७ लाख एवढा व्याज परतावा वितरीत केला गेला आहे. महामंडळातर्फे व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाख होती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे. त्याचबरोबर, सीसी आणि ओडी कर्जांतर्गतचा व्याज परतावा पुन्हा सुरु करण्यात आला आहे, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जांना राज्य सरकारतर्फे हमी देण्याचा निर्णय झाला होता आणि मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला होता. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर ही हमी पुन्हा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मराठा समाजातील तरुणांना मोठा फायदा होणार आहे, असे नरेंद्र पाटील यांनी नमूद केले आहे.

(interest repayment scheme)याचबरोबर, महामंडळाच्या कर्ज योजनातून एक लाख मराठा उद्योजक तयार करू असे सांगत नरेंद्र पाटील म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत तसेच, सारथी आणि महाज्योती महामंडळांच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शंभर विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नाशिक येथे मुलींचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

हे हि वाचा : बांधकाम खर्च कमी होणार! स्टील प्रतिटन 15 हजार रुपयांनी स्वस्त

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

2 thoughts on “अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा 15 लाख रुपये, नरेंद्र पाटलांची माहिती( interest repayment scheme)”

Leave a Comment