Banking: २२ सप्टेंबरपासून बंद होणार ही बँक, ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे, आरबीआयने दिली माहिती 2022 - डिजिटल शेतकरी

Banking: २२ सप्टेंबरपासून बंद होणार ही बँक, ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे, आरबीआयने दिली माहिती 2022

मुंबई – बँकेत(Banking)पैसे ठेवणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे तसेच जर तुमचेही बँकेत (Banking)खातं असेल तर तुमच्यासाठी ही माहिती अत्यावश्यक आहे.. रिझर्व्ह बँक लवकरच एक बँक बंद करणार आहे आणि आरबीआयकडून पुण्यातील रुपी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आला होता आणि  आता२२ सप्टेंबरपासून ही बँक बंद होणार आहे.

रिझर्व्ह बँकेकडून बँकांसाठी अनेक प्रकारचे आदेश जारी केले जातात, त्याचं पालन करणं अनिवार्य असतं आणि  तसेच आरबीआय बँकांसाठी सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सूचना जारी करत असते. या सूचनांचं पालन न करणाऱ्या वित्तीय संस्थांचा परवाना रद्द करण्यात येत असतो  त्यानुसार पुण्यातील रुपी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

आरबीआयच्या या निर्णयानंतर येत्या २२ सप्टेंबरपासून ही बँक(Banking) बंद होणार आहे आणि  रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार २२ सप्टेंबर रोजी ही बँक आपले कामकाज बंद करनार आहे. त्यानंतर ग्राहक या बँकेत पैसे जमा करू शकणार नाहीत, तसेच बँकेतून पैसे काढू शकणार नाही आणि  तसेच कुठलाही व्यवहार करू शणार नाहीत. आरबीआयने सांगितले की, या बँकेकडे पुरेसा निधी आणि पुढे कमाई करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या बँकेचा परवाना रद्द करण्यात येत आहे या दरम्यान, बँकेत ठेवी असणाऱ्या ठेवीदारांना बुडीत ठेवींच्या प्रमाणात ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे….

हे हि वाचा : शेतकऱ्यांना 6 नव्हे, 12 हजार रुपये मिळणार…!! केंद्राप्रमाणे राज्य सरकारचीही खास योजना मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकर्या साठी मोठा निर्णय

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment