Cattle Reproduction : कृत्रिम रेतनाने कशी वाढवायची कालवडींची संख्या?  पहा . - डिजिटल शेतकरी

Cattle Reproduction : कृत्रिम रेतनाने कशी वाढवायची कालवडींची संख्या?  पहा .

Cattle ReproductionGender classified Artificialv Insemination : भारतात देशी गायीच्या उच्च प्रजाती असून यामध्ये प्रामुख्याने गीर, लालसिंधी व साहिवाल या गाईंच्या दुधाला प्रचंड मागणी असते तसेच देशी गायीमध्ये आजही पैदाशी करिता कृत्रिम रेतनाचा वापर कमी असून वळू चा वापर अधिक प्रमाणात होत आहे.(Cattle Reproduction)

म्हणजेच या देशी गायींमध्ये वळूद्वारे नैसर्गीक रेतन करुन वासरांची पैदास केली जात असते… या पैदाशीतून नर, मादी वासरे जन्माला येत असतात. वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैलांना कमी मागणी असते आणि याशिवाय नर वासरांच्या कमी वापरामुळे बैलापासून फायदा मिळत नाही.त्यामुळे प्रत्येक वेताला मादी वासरु मिळाव अशी प्रत्येक पशूपालकाची इच्छा असते मात्र हे नैसर्गीक रेतनातून शक्य होत नाहीत. आता लिंग वर्गीकृत रेतमात्रेचे कृत्रीम रेतन करुन प्रत्येक वेताला मादी वासरे मिळवता येणे शक्य आहे.

पशुवैद्यकीय क्षेत्रातील हे अद्ययावत तंत्रज्ञान पूर्वी ब्राझील, अमेरिका अशा देशांमध्ये होते आणि हेच तंत्रज्ञानआता महाराष्ट्रात विकसित झाले असून देशी गायीमध्ये हे तयार करण्यात आले आहे.कृत्रिम रेतन रेतन म्हणजे काय तर एका सिद्ध वळूची विर्यमात्रा शास्त्रीय पद्ध्तीने संकलित करून वीर्याची शीत तापमानाला साठवणूक करून माजावर आलेल्या गायी-म्हशींच्या गर्भाशयात नळीद्वारे योग्य वेळी, योग्य ठिकाणी सोडणे होय.

हे हि वाचा : जनावरांवरील गोचीड नियंत्रण

लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतन तंत्रामध्ये वळूच्या वीर्यातील एक्स व वाय गुणसूत्रे असणारे शुक्राणू वेगळे केले जात असतात. एक्स गुणसूत्र असणाऱ्या शुक्राणूंचे वीर्यकांडेद्वारे कृत्रिम रेतन केल्यामुळे फक्त मादी कालवडी तयार होत असतात .या वीर्यकांडीचा रेतनाकरिता वापर केल्यास जवळपास ९९ % इतकी मादी वासरे मिळण्याचे प्रमाण असतं आणि गाय गाभण राहण्याचे प्रमाण ३० ते ४० % असतं. तसेच प्रथम गाभण राहणाऱ्या गाईमध्ये हे प्रमाण अधिक असतं.

आता पाहुया लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतनाचे फायदे काय आहेत ते पाहूया…

लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतनामुळे नर वासरे तयार होत नसल्यामुळे प्रत्येक गायीपासून चार ते पाच जास्तीची मादी वासरे तयार होत असतात.यामुळे कमी वेळेत जास्त प्रमाणात उच्च प्रतीची पुढची पिढी निर्माण होत असते.(Cattle Reproduction)

बैलाच्या कमी वापरामुळे व मागणी नसल्यामुळे पशुपालकांकडे नको असलेली नर वासरे तयार होत नाहीत आणि वळू संगोपनाचा अतिरिक्त खर्चही टाळता येत असतो. गाभण गाईंना विकताना जास्त किंमत मिळाल्यामुळे पशुपालकाचा फायदा होत आहे. देशी गायीच्या प्रजातीमध्ये गीर, लालसिंधी साहिवाल यांच्या वीर्यकांडी सध्या उपलब्ध झाली आहेत आणि या विर्यकांड्याची सरासरी किंमत नऊशे ते एक हजारा पर्यंत असते. अशा वीर्यकांडीचा वापर केल्यास दूध उत्पादन व उच्च वंशावळीची पिढी कमी वेळेत मोठ्या संख्येने तयार होतना पाह्यला मिळत आहे.Cattle Reproduction

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment