Chili Market : लाल मिरचीला दराचा ठसका 2023 - डिजिटल शेतकरी

Chili Market : लाल मिरचीला दराचा ठसका 2023

Chili Market : देशात यंदा मिरची उत्पादन (Chili Production) घटले तसेच गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही तेलंगणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मिरची पिकावर (Chili Pest) तुडतुड्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

उत्पादकता जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी घटल्याचे शेतकरी सांगत आहेत आणि दुसरीकडे मिरचीला मागणी आहे. त्यामुळे सध्या मिरचीचे दर (Chili Rate) तेजीत आहेत.

यंदा उत्पादन कमी असल्याने बाजारातील आवक वाढल्यानंतरही दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त केला आहेत.

देशात मिरची उत्पादनात तेलंगणा आघाडीवर आहे तसेच महाराष्ट्रातही नंदूरबारसह काही जिल्ह्यांमध्ये मिरची उत्पादन होत असते. मिरची पिकावर यंदाही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे यंदाही उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी सांगण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांना एकरी सरासरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते पण यंदा उत्पादन १० ते १२ क्विंटलपर्यंतच स्थिरावल्याचे शेतकरी सांगत सद्य आहेत. तसेच अनेक भागांतील शेतकऱ्यांनी ८० टक्क्यांपर्यंत माल विकला गेला आहे.

देशाती गेल्या हंगामातही मिरची उत्पादन घटले होते आणि त्यामुळे सध्या गोदामांमध्ये शिल्लक साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. शिल्लक मिरचीचा साठा यंदा ९० टक्क्यांपर्यंत कमी आहे तसेच यंदाही उत्पादन घटले. त्यामुळे सध्या मिरचीचे दर तेजीत आहेत. शेतकऱ्यांनाही यंदा चांगला दर मिळाला आहे.

पण उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना फार नफा होताना दिसत नाही आणि मिरचीला सध्या चीन आणि बांगलादेशमधून मागणी आहे. सध्या नव्या मालाचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे अनेक वाणांचे दर तेजीत आहेत आणि त्यामुळे अनेक आयातदार नवा माल बाजारात येण्याची वाट पाहत आहेत.

तेलंगणात दरात तेजी ( Chili Market )

देशात तेलंगणात सर्वाधिक ४ लाख हेक्टरवर मिरची लागवड झाली तसेच देशातील एकूण क्षेत्रापैकी २२ टक्के तेलंगणात आहे. तर ३८ टक्के उत्पादन होत असते. यंदा तेलंगणात ७.२० लाख टन मिरची उत्पादन झाले आहे.

पण तेलंगणातच दर तेजीत आहेत आणि तेलंगणातील बाजारात तेजी वाणाच्या मिरचीला सरासरी १८ हजार ते २३ हजार रुपये दर मिळत आहे. गेल्या हंगामात हाच भाव १७ हजार रुपयांच्या दरम्यान होता. वंडर हॉट वाणाचे दर सध्या ३८ हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले. Chili Market

गेल्या हंगामात हाच भाव २९ हजार रुपये होता. तर यूएस ३४१ वाणाने २६ हजारांचा टप्पा गाठला आहे. मागील हंगामात हाच भाव २१ हजार रुपये होता आणि पुढील काळात बाजारात मिरचीची आवक वाढेल. पण दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत.Chili Market

हे हि वाचा : उंदीर वर्गीय प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नवीन संशोधन

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment