Cotton : गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल कसे कराल नियोजन ? 2022 - डिजिटल शेतकरी

Cotton : गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल कसे कराल नियोजन ? 2022

सध्या काही भागातील वेळेवर लागवड झालेल्या कपाशीवर(Cotton)गुलाबी बोंडअळीचा (Pink Boll Worm) प्रादुर्भाव जास्त प्रमाणात  दिसून येत आहे. कपाशी पीक सध्या फुले आणि पाते लागण्याच्या अवस्थेमध्ये आहे. ढगाळ वातावरणामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रिय झालेले दिसत आहे आणि मादी पतंग पाते, फुले यावर अंडी घालतात, त्यामुळे कपाशीच्या(Cotton) पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ आहे. जेणेकरून पुढे बोंडे लागल्यानंतर होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी करता येणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञांनी गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी पुढील उपाययोजना सुचविलेल्या जात(Cotton) आहे.

Cotton

  1. कपाशीच्या(Cotton) पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करण्यात याव्या.
  2. किडीची आर्थिक नुकसान पातळी ओळखण्यासाठी हेक्टरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे लावले जावे. तर मोठ्या प्रमाणात पतंग जमा करून नष्ट करण्यासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावले जावे आणि  सापळ्यांमध्ये गॉसील्यूर म्हणजेच गुलाबी बोंडअळी चे ल्यूर वापरत जावे.
  3. ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी २ ते ३ या प्रमाणात पीक ६०-६५  दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावावे.
  4. ५ टक्के निंबोळी अर्क किंवा बिव्हेरिया बॅसियाना या जैविक बुरशीयुक्त कीडनाशकाची ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रासायनिक पद्धतीने नियंत्रण कसं कराल ?

कामगंध सापळ्यामध्ये सलग तीन दिवस ८ ते १० पतंग प्रति सापळा किंवा १ अळी प्रति १० फुले किंवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या दिसून आल्यास खालीलपैकी एका रासायनिक कीडनाशकाची फवारणी करण्यात यावी.

१. प्रोफेनोफॉस (५० टक्के) २ मिली प्रति लिटर पाणी किंवा जास्त प्रमाणत असेल तर २.५ मिमी

२. इमामेक्टिन बेंझोएट (५ टक्के) ०.४-०.५  ग्रॅम प्रति लिटर किंवा

३. प्रोफेनोफोस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के या पूर्व मिश्रित कीडनाशकाची २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणात आलटून पालटून फवारणी करावी आणि लक्षात घ्या हे प्रमाण साध्या फवारणी पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी तीन पट जास्त प्रमाण वापरले जावे.

दिलेल्या कीडनाशकामध्ये कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशक,(Cotton) आणि बुरशीनाशक, विद्राव्य खत,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नका. लागोपाठ एकाच प्रकारचे कीडनाशक फवारू नये आणि शिफारस केलेल्या किडनाशकांची आलटून पालटून फवारणी कण्यात यावी आणि  अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या ०२४५२-२२९००० या क्रमांकावर संपर्क साधावा.

हे हि वाचा : कापूस शेतकरी यंदा होणार मालामाल काय भाव राहतील पहा

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

3 thoughts on “Cotton : गुलाबी बोंडअळीला कसं रोखाल कसे कराल नियोजन ? 2022”

Leave a Comment