Cotton Market : कापूस उत्पादकच स्टाॅकीस्ट झाला का? 2022 - डिजिटल शेतकरी

Cotton Market : कापूस उत्पादकच स्टाॅकीस्ट झाला का? 2022

Market: यंदा देशातील कापूस लागवड (Cotton Sowing) वाढली मात्र उत्पादकता कमी राहीली आहे. कापसाचा हंगाम (Cotton Season) सुरु होऊन आता अडीच महिने झाले आहे. मात्र यंदा बाजारातील आवक खूपच कमी आहे मग कापसाचा साठा नेमका कुणाकडे आहे? कापूस विक्रीबाबत यंदा शेतकऱ्यांची भुमिका काय आहे?  देशातील कापूस उत्पादन यंदा उद्योगाच्या अंदाजापेक्षा कमीच राहील, असं बाजारातील अभ्यासक सांगत आहेत आणि मागील हंगामात कापसाला चांगला दर मिळाला होता तसेच त्यामुळं यंदा देशातील कापूस लागवड वाढली.

मात्र पिकाला पावसाचा फटका बसला, कीड- रोगांचाही प्रादुर्भाव झाला आहे. Market त्यामुळं उत्पादकता कमी राहीली आहे. भारतासोबतच पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्येही कापूस पिकाला फटका बसला आहे. त्यामुळं जागतिक कापूस वापर कमी राहण्याचा अंदाज असला तरी दर चांगलेच राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. चालू हंगामात १ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर या अडीच महिन्यांच्या काळात ५८ लाख गाठी कापसाची आवक झाल्याचं उद्योगांनी स्पष्ट केलं होते. मात्र गेल्यावर्षी याच काळात १०६ लाख गाठी कापसाची आवक झाली आहे. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा ४५ टक्क्यांनी कापूस आवक कमी राहीली आहे. मागील काही दिवसांपासून दर नरमल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली आहे.

यंदा देशातील कापूस उत्पादन कमी आहे, डिसेंबरनंतर कापसाचे दर सुधारू शकतात याचा अंदाज शेतकऱ्यांना आला आहे. त्यामुळं शेतकरी सध्या गरजेपुरताच कापूस विकत आहेत आणि त्यामुळं सध्या तरी कापसाचा स्टाॅकीस्ट शेतकरीच असल्याचं जाणकार सांगत आहे. सध्या देशातील बाजारात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. जानेवारीत कापसाचे दर वाढू शकत आहेत. शेतकऱ्यांना यंदा सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असा अंदाजही कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आहे. Market

Soybean

  1. सोयाबीन दर कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ उतार सुरु आहेत तसेच सोयातेलही मागील काही दिवसांपासून एका भावपातळीभोवती फिरत आहे. त्यामुळं देशातील सोयाबीन दरही स्थिरी आहेत तसेच सोयाबीनच्या दरात वाढ नसल्यानं बाजारातील आवकही मर्यादीत होतेय. सोयाबीन दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवलं आहे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांच्या मते खाद्यतेल बाजारात जानेवारीत सुधारणा होऊ शकत आहे. त्याचा फायदा सोयाबीनला मिळेल आणि सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळतोय.Market

  1. तुरीचा बाजार तेजीतच

शेतकऱ्यांची तूर आता बाजारात दाखल होत आहे. मात्र दुसरीकडे आयातही जोमात सुरु आहे आणि सध्या म्यानमार आणि सुदान या देशांमधून आयात होणाऱ्या तुरीचे भाव ७ हजार २०० ते ७ हजार ३५० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर मालावी आणि मोझांबिकच्या तुरीला ५ हजार २०० ते ६ हजार ५० रुपये दर मिळत आहे. मात्र हजर बाजारात यापेक्षा कमी दर मिळतोय आणि दुसरीकडं बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. यंदा तुरीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

  1. कारल्याला चांगला उठाव

देशातील बाजारात कारल्याला सध्या चांगला दर मिळत आहे. कारल्याला मागणी वाढल्याचं विक्रेते सांगत आहेत. मात्र मागणीच्या तुलनेत बाजारातील आवक काहीशी मर्यादीत असल्याचंही सांगितलं जात आहे. सध्या मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या बाजार समित्या वगळल्या तर सरासरी आवक ही १० ते २० क्विंटलच्या दरम्यान होत आहे. त्यामुळं सध्या कारल्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय आणि कारल्याचे दर टिकून राहतील असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

  1. पपईला सरासरी दर

राज्यात पपई लागवडीचं क्षेत्र जास्त आहे आणि उत्पादनही वाढतंय. मात्र प्रत्येक हंगामात पपईला दरासाठी झगडावं लागतं आणि सध्या पपईला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ते २ हजार रुपये दर मिळतोय. सध्या पपईला उठावही मर्यादीत राहतोय तसेच परिमामी दर काहीसे दबावात आहेत. राज्यात उन्हाचा चटका वाढल्यानंतर पपईच्या दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हे हि वाचा : शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment