Cotton rates today कापसाचा भाव 7500 ते 7800 रुपये होता आता मात्र आज कापसाच्या भावात वाढ झाल्याचे पाहायला मिळात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या किमतीत ३ टक्क्यांनी वाढ झाल्याने राज्यातही कापसाचे भाव वाढत आहेत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा झाल्यानंतर देशातही कापसाचे भाव वाढले आहे. गुरुवारी कापूस वायदे प्रति गाठी 50,000 रुपयांच्या आसपास स्थिरावले आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाला 8 हजार 300 रुपये भाव मिळाला आहे. हा दर कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला जात आहे.
Cotton rates today: राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कापसाला 8000 ते 8200 रुपये भाव मिळाला आहे. राज्यातील सेलू, सिंदी, मानवत येथे कापसाच्या दरात वाढ दिसून आली आहे.
राज्यातील इतर बाजार समित्यांमध्येही कापसाच्या दरात वाढ झाली आहे तसेच गेल्या काही दिवसांपासून कापसाला 7500-7800 रुपये भाव मिळत होता, मात्र आज हा भाव सरासरी 7900-8200 रुपयांवर पोहोचला गेला आहे.