मिरची पिकामध्ये मुख्यत्वे मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यावर योग्य उपाययोजना केल्यास मिरचीवरील रोगनियंत्रण होणार शक्य आहे.
रोपातील मर
- मिरची रोपवाटिकेमध्ये बीज लागवडीनंतर दुस-या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असतो. नुकसानग्रस्त रोपाचा जमिनीलगतचा भाग मऊ पडून रोपे कोलमडतात व मरत असतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी खालील उपाय योजना करावेत.
- रोपवाटिका उंच गादीवाफ्यावर केल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन बुरशीची वाढ रोखण्यास मदत होत असते. एकरी लागवडीकरिता ६५० ग्रॅम बियाणे वापरावे आणि दाट लागवड केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होत असतो.
- मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी आणि कॉपर ऑक्झिक्लोराइड ३o ग्रॅम प्रति १o लिटर प्रमाणे बियाणे लागवडीपासून दुस-या आठवड्यात व तिस-या आठवड्यातवाफ्यावर ड्रेचिंग करावयाची असते.
- डायबँक आणि फळ सडणेहा रोग कोरडवाहू तसेच ओलिताखालील अशा दोन्ही मिरची पिकांमध्ये आढळून येत असते. या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे तसेच हवेद्वारे होऊन पिकाची फांदी शेंड्याकडून खालच्या दिशेने वाळत येत असते. नुकसानग्रस्त फांदीची साल प्रथम करड्या रंगाची होऊन फांदीवर घट्ट काळ्या रंगाचे ठिपके आढळत असतात. पक्र झालेल्या फळावर गोलाकार किंवा अंडाकृती काळे ठिपके आढत असतात आणि नुकसानग्रस्त फळे सुकतात आणि वाळतात.
नियंत्रण
- हा रोग बियाण्यापासून होत असल्यामुळे रोगमुक्त बियाण्याचाच वापर हा केला पाहिजे. मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करायची असते.
- या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रोगग्रस्त फांद्या गोळा करून जाळून टाकण्यात याव्या. बुरशीजन्य रोग आढळून आल्यानंतर २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ३o ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड १o लिटर पाण्यात घेऊन गरजेनुसार नियंत्रित फवारण्या करून घ्याव्या.
हे हि वाचा : हंगामी मिरची पीक लागवड शेतकऱ्यांसाठी सोपी पद्धत 2022
पानांवरील ठिपका
साधारणतः ऑक्टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांत रोगाचा प्रादुर्भाव पानावर करड्या रंगाच्या लहान ठिपक्यांच्या स्वरूपात आढळून येत असते आणि काही कालावधीनंतर या ठिपक्यांचा रंग बदलून पांढुरका रंग पानाच्या मध्यभागी आढळतो. तसेच, पानाच्या कडेला गर्द करडा रंग असतो आणि या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास पाने भरपूर प्रमाणात पिवळी पडून गळून जातात. नियंत्रण : १० ग्रॅम काबॅन्डाझिम किंवा २५ ग्रॅम मॅन्कोझेब हे बुरशीनाशक प्रति १०-१२ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जिवाणुजन्य पानांवरील ठिपके
या रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात फार आढळून येतो. रोगामुळे पाने, खोड व फळांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असते. सुरवातीला लाल करड्या रंगाचा ठिपका नंतर काळ्या मोठ्या ठिपक्यामध्ये रुपांतरित होऊन ठिपक्याच्या कडा पिवळ्या होत असतात. प्रादुर्भाव अधिक असल्यास नुकसानग्रस्त पाने पिवळी पडून गळून पडतात. खोडावरील ठिपके फांद्यांवर पसरून परिणामी खोड व फांद्या वाळत असतात.
नियंत्रणएक ग्रॅम स्ट्रेप्टोमायसीन अधिक ३0 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन पिकावर फवारणी करत असतात.
भुरी रोग
पिकामध्ये भुरी रोग साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान आढळत असतो. पांढरी पावडर पानाच्या खालच्या बाजूला आढळते आणि अधिक प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळी पडून गळतात फुलांची निर्मिती पूर्णतः बंद होते.
नियंत्रण
पाण्यात विरघळणारे गंधक ३0 ग्रॅम प्रति १०-१२ लिटर पाण्यात फवारणी करत असतात .
ट्रायडिमेफोन किंवा पेनकोनझोल किंवा मायकोबुटानिल हे बुरशीनाशक १०-१२ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
विषाणुजन्य रोग
विषाणुजन्य रोगाचा (काकडी मोझाक विषाणू, बटाटा विषाणू तंबाखू मोझाक विषाणू आणि पर्णगुच्छ विषाणू इत्यादी) प्रादुर्भाव हा बियाण्यामार्फत किंवा मावा, फुलकिडे व तुडतुडे या रसशोषण करणा-या किडींद्वारे होत असतो. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रोगामुळे पानाच्या आकारात बदल होतो आणि पानाच्या पृष्ठभागावर हलक्या आणि गर्द हिरव्या रंगाचे ठिपके आढळतात. तसेच पाने काठाने गुंडाळतात आणि झाडाची वाढ खुटते आणि फुलांची निर्मिती बंद होत असते.
नियंत्रण
मिरची पिकामध्ये स्वच्छता ठेवून पीक तणमुक्त ठेवले पाहिजे. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून टाकावीत व जाळून नष्ट करण्यात यावी. जेणेकरून या रोगाचा संपूर्ण पिकामध्ये प्रादुर्भाव होत नही.
रसशोषण करणा-या किडीच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार ऍसिफेट १0-१२ ग्रेम किंवा फिप्रोनिल २0 मि.लि. प्रति १0-१२ लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. मिरची पीक क्षेत्राच्या कडेला दोन-तीन ओळींमध्ये मका पिकाची लागवड केल्यास फायदेशीर ठरत असते.
रोपातील मर ,डायबँक आणि फळ सडणे,नियंत्रण,पानांवरील ठिपका,जिवाणुजन्य पानांवरील ठिपके,नियंत्रण,भुरी रोग,नियंत्रण,विषाणुजन्य रोग,नियंत्रण याची माहिती पहिली आहे. आम्ही डिजिटल शेतकरी आपणास असाच अनेक रोक पिक, फळबाग,या विषय माहिती पाहत असतो या पुडे हि आपण असाच प्रकारे माहिती देणार आहोत.धन्यवाद असेच सहकार्य असू द्या.
2 thoughts on “मिरचीवरील रोगनियंत्रण 2022”