Election Commission: कोणतीही निवडणूक आली, की उमेदवारांकडून मतदारांना मोफत जेवण, दारू नि पैशांचे वाटप केलं जातं. ही बाब लक्षात आल्यावर निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या (Election Commission)नियमांत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोफत जेवण, दारू वाटप गुन्हा
मतदारांना हॉटेलात मोफत जेवण देणं, दारू पाजणं गुन्हा ठरणार आहे. पूर्वी मतदानाच्या 48 तासांआधी या गोष्टींना मनाई होती. आता त्यात आणखी वाढ केली जाणार असून, हा कालावधी 72 तासांचा केला जाणार आहे.
18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा निवडणूक आचार संहितेच्या कक्षेत समावेश असेल. मतदार यादीत नाव नसले, तरीही 18 वर्षांवरील तरुणांना निवडणूक आचार संहितेच्या या नियमांचं पालन करावं लागणार आहे.
निवडणुकीत पैसे वाटपाच्या नियमाबाबत याआधीच अत्यंत कठोर नियम केलेले आहेत. मात्र, आता रेस्टॉरंटमध्ये फुकटात जेवण देण्यावरही प्रतिबंध घातला जाणार आहे. अशा नियमाचा समावेश करण्याची निवडणूक आयोगाची पहिलीच वेळ आहे.
डिजिटल व्यवहारावर नजर
आता डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यावरही निवडणूक आयोगाची(Election Commission) करडी नजर असेल. मतदारांना डिजिटल ट्रान्जेक्शन केल्यास तो गुन्हा मानला जाणार आहे.
हे हि वाचा : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा 15 लाख रुपये, नरेंद्र पाटलांची माहिती ,मराठा समजासाठी आनंदाची बातमी
डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇