Fertilizers Subsidy : शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय ! आता शेतकऱ्यांना खतांवरही मिळणार 100 टक्के अनुदान - डिजिटल शेतकरी

Fertilizers Subsidy : शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय ! आता शेतकऱ्यांना खतांवरही मिळणार 100 टक्के अनुदान

Bhausaheb Phundkar scheme : Fertilizers Subsidy राज्यातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली आहे . या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना खड्डे खोदणे, ठिबक सिंचन खरेदीसाठी १०० टक्के अनुदान दिले जात होते आणि त्याचबरोबर आता फळबागांसाठी आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला गेला आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत सन 2023-24 पासून या योजनेअंतर्गत आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर या १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे आणि तसेच फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.Fertilizers Subsidy

हे हि वाचा : शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपालन, वराहपालन क्षेत्र आणि वैरण 50 % अनुदान अर्ज सुरु

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा

Leave a Comment