Fodder Defect : चारा टंचाई टाळण्यासाठी उपाययोजना 2023 - डिजिटल शेतकरी

Fodder Defect : चारा टंचाई टाळण्यासाठी उपाययोजना 2023

Fodder Defect Animal Care : सध्या पेरणी झालेली पिके पावसाने ओढ दिल्यामुळे अडचणीत आहेत आणि त्यामुळे एकीकडे चाऱ्याची कमतरता आणि दुसरीकडे पशुखाद्याचे वाढते दर लक्षात घेता पशुपालकांनी चारा टंचाईवर मात करण्यासाठी योग्य प्रकारे उपाययोजना करण्याची गरज आहे.(Fodder Defect)

१) सध्या उपलब्ध चाऱ्याचा सुयोग्य वापर करावा आणि चारा कुट्टी करून जनावरांच्या शारीरिक गरजेनुसार दिला पाहिजे. विनाकारण जास्तीचा चारा जनावरांना देवू नका.

२) गोठ्यातील जनावरांची शारीरिक अवस्थेनुसार वर्गवारी करून त्यांना चाऱ्याची किती गरज आहे त्या प्रमाणातच चारा दिला जावा  आणि चारा जमिनीवर न टाकता गव्हाणीत द्यावा. जेणेकरून चारा तुडवून खराब होणार नाही तसेच चारा टाकलेल्या गव्हाणीत मोठी जनावरं अथवा लहान वासरे जाऊन चारा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.

३) कडब्याची पेंढी सोडून जशीच्या तशी जनावरांना खाण्यास न देता कुटटी करून द्यावी तसेच एकाचवेळी जास्त चारा न टाकता विभागून द्यावा. जेणेकरून चाऱ्याचा जास्त अपव्यय होणार नाही आणि वाळलेल्या चाऱ्याचे खाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी गूळ आणि मीठ एक टक्का या प्रमाणात फवारून रात्रभर झाकून ठेवून सकाळी जनावरांच्या आहारात वापर करावा. यामुळे चारा न खाता वाया जाणार देखील नाही.

हे हि वाचा : डिजिटल स्वाक्षरी असलेले 7/12 कसा काढावा 

४) वाळलेल्या चाऱ्याचे पचन वाढवण्यासाठी प्रोबायोटिक्सचा जनावरांच्या आहारात वापर करावा आणि सध्या जास्तीचा हिरवा चारा असेल तर मुरघास बनवून चारा साठवून ठेवावा.

५)उपलब्ध चाऱ्याच्या ठिकाणी जनावरे चरायला न सोडता तसा चारा कापून ठेवावा आणि त्यानंतर जनावरांच्या गरजेनुसार आहारात वापर करावा. यामुळे जनावरांनी तुडवून चारा खराब होणार नाही तसेच चाऱ्याची चांगली वाढ देखील होणार होईल.

५) पाणी पुरवठ्याची सोय असलेल्या ठिकाणी हंगामी चारा पिकांची लागवड करावी आणि हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनवून ठेवावा. जेणेकरून भविष्यातील चारा टंचाईवर मात करता येईल.

Leptospyrosis Disease
Leptospyrosis Disease

६) सोयाबीन, तूर गुळी,भुसकट, दुय्यम पदार्थांचा साठा करून ठेवावा आणि झाडपाल्याची साठवणूक करावी. एखाद्या शेतकऱ्यांकडे जास्तीचा चारा असेल तर विकत घेऊन त्याचा मुरघास बनवला जावा.

७) अतिरिक्त धान्य विक्री न करता भविष्यात घरच्या घरी पशुखाद्य बनवण्यासाठी साठा करण्यात यावा. साठवलेल्या धान्यास उंदीर व किडे लागणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच सद्या जे घटक स्वस्त मिळत आहेत ते विकत घेऊन साठा करावा.

८) वाळलेला चारा, गुळी/ भुसकट कोरड्या ठिकाणी साठा करावा व  पाऊस पडल्यास भिजणार नाही अशा ठिकाणी साठा करावाFodder Defect

९) बाजारपेठेतील शिल्लक भाजीपाला जमा करून मुरघासामध्ये त्याचा वापर करता येणे शक्य आहे तसेच दररोजच्या आहारातही वापर करणे शक्य आहे.

१०) कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत आणि उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी, चारा उत्पादनासाठी काटकसरीने वापर करावा.

११) भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून चारा उत्पादन घेतले जावे.

१२) ज्या भागात फळप्रक्रिया उद्योग आहेत अशा भागामध्ये प्रक्रिया करून राहिलेला फळाचा साका वाळवून भुकटी करून पशुआहारात काही प्रमाणात वापर करण्यात यावाFodder Defect

१३) पशुखाद्य, तुरटया, पऱ्हाट्या दळून एकत्रित मिश्रण करून संपूर्ण खाद्य बनवता येणे शक्य आहेFodder Defect

१४) मक्याचे बोरकुंड, शेंगाची टरफले, चिंच बिया, केळीची पाने यांचा योग्य प्रमाणात पशुआहारात वापर करण्यात यावा.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment