Goat Diet Goat Feed Management: शेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडांवर अवलंबून असते आणि त्यासाठी शेळी गाभण असणे आवश्यक आहे. दोन वर्षाला तीन वेळेस शेळी व्याली पाहिजे.
शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व गाभण शेळीच्या आरोग्य व व्यवस्थापनेला सुद्धा असते. त्यामुळे पावसाळ्यात शेळ्यांना योग्य आहार देण्यासोबतच शेळ्यांच्या आरोग्याचीही योग्य काळजी घ्यावी लागत असते.
पावसाळ्यात शेळ्यांना कसा आहार द्यावा? त्यांना आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी? याविषयी उदगीर येथील पशु वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी दिलेली माहिती आपण पाहुया.
गाभण शेळ्यांचा आहार
चांगल्या वजनाची सशक्त करड जन्मण्यासाठी गाभण काळातच शेळ्यांचे योग्य व्यवस्थापन करावे आणि गाभण शेळ्यांना वाळलेला ओला चारा, खुराक व खनिज मिश्रण यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे.
गाभण शेळ्यांना सहज पचणारा चारा आणि योग्य प्रमाणात पशुखाद्य दिला पाहिजे.गाभण काळातील शेवटचे किमान १ महिना व्यायच्या अगोदर समतोल आहाराचा पुरवठा करावा व गोठ्यातच फिरण्याची सोय करावी लागते.
गाभणकाळात शेवटच्या ३-४ आठवड्यामध्ये गर्भाशयातील करडांचा उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीचा चाऱ्याबरोबरच दररोज २५० ते ३५० ग्रॅम खुराक द्यावा आणि स्वच्छ पाणी द्यावे. थंड पाणी किंवा पावसाचे पाणी देऊ नये त्यामुळे शेळी सर्दी सारखे आजार होऊ शकत आहेत.शक्यतो पावसाळ्यात गाभण शेळ्यांना सुका चारा द्यावा जसे कि भरडलेला मका, गहू सोयाबीन यांचे मिश्रण करून दिले पाहिजे. ( Goat Feed Management )
पावसाळ्यात गाभण शेळ्यांना होणारे आजार व उपचार पावसाळ्यात गाभण शेळ्यांना गर्भपात, अंग बाहेर येणे, पोटफुगी, आंत्रविषार, बुळकांडी, अपचन, अशा प्रकारचे आजार उद्भवत असतात.
पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेळ्यांना श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते आणि गोठ्यातील जमीन ओली असेल तर खुरांमध्ये ओलसरपणा राहून शेळ्यांचा खुरामध्ये जखमा होतात.
तसेच पावसाळ्यात हिरवा ओला चारा जास्त प्रमाणात उपलब्ध असतो त्यामुळे गाभण शेळ्यांमध्ये अंग बाहेर येणे हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो असे असल्यास पशुवैद्याकाकडून योग्य उपचार करून करावेत. Goat Feed Management