Goat Rearing : अकोला येथील ‘इंजियिनर’ असलेल्या शुभम कांबळे या तरुणाची कोरोना काळात नोकरी गेली होती. पण निराश न होता त्याने अभ्यासातून शेळीपालन व कुक्कुटपालनात संधी शोधली आणि व्यावसायिक दृष्टिकोन, कौशल्य व ग्राहक जपण्याची हातोटी यातून आपला ठसा उमटवत व्यवसाय उलाढालीसह स्थिरस्थावर होण्याकडे त्याची वाटचाल आहे.(Goat Rearing)
अकोला शहराला लागूनच असलेल्या हिंगणा गाव शिवारात शुभम कांबळे या युवकाचे कुटुंब राहते आणि त्याचे वडील मधुकर भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी महासंघ व खाजही बॅंकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. आई ज्योती बचत गटाच्या संयोजक आहेत तसेच शुभमने ‘इलेक्ट्रॉनिक्स व टेलि कम्युनिकेशन्स’ विषयातून इंजिनिअरिंग केले आहे. आणि धाकटा भाऊ शिवम एमकॉम करीत आहे.
पूरक व्यवसायात उडी
सन २०१७-१८ मध्ये ‘इंजिनिअरिंग’ केल्यानंतर शुभम मुंबईला नोकरीसाठी मामाकडे गेला होता. सन २०२० मध्ये कोरोना काळात नोकरी गेली आणि मग तो गावी परतला. पुढे काय करावे याबाबत विचारमंथन सुरू झाले. ग्राहक व बाजारपेठा यांचा अभ्यास करताना शेतीपूरक शेळीपालन व कुक्कुटपालनात चांगली संधी असल्याचे जाणवले. भावालाही सोबतीला घ्यायचे ठरविले आणि वडिलांनीही व्यवसायासाठी १५ लाखांचे भांडवल आणि पाठबळ देत आत्मविश्वास वाढवला. त्यातून श्री बालाजी कृषी उद्योग फार्मची स्थापना झाली तसेच जिल्ह्यातील यशस्वी शेळीपालक गणेश काळे (तामसी बुद्रुक) यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय शुभमने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील १५ दिवसांचे शास्त्रीय पद्धतीने शेळीपालन विषयाचे प्रशिक्षण घेतले आहे.
व्यवसाय उभारणी
कांबळे कुटुंबाची शेती नाही पर्याय म्हणून भाडेतत्त्वावर तीन एकर शेती घेतली. त्याचे वर्षाला ६० हजार रुपये भाडेशुल्क आहे आणि दरवर्षी त्यात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा करार आहे. येथील अर्धा एकरात शेळीपालन, पोल्ट्री व अन्य जागेत चारा व हंगामी पिके असे नियोजन केले आहे.(Goat Rearing)
सन २०१९-२० मध्ये २० ते २५ उस्मानाबादी शेळ्या व बोकड खरेदीतून व्यवसायाला सुरुवात झाली तसेच परिश्रम, पद्धतशीर नियोजन व दूरदृष्टीतून व्यवसाय आकारास येऊ लागला. सुमारे तीन- चार वर्षांच्या काळात शेळ्यांची संख्या १०० ते १२५ पर्यंत पोचली आहे. मुक्त पद्धतीचे शेड बांधले आहे…. शेळीफार्मला लागूनच कुक्कुटपालन शेड आहे. गावरान पक्ष्यांचे संगोपन येथे होते आणि कोंबड्यांच्या विक्रीपेक्षा अंडी विक्रीवर अधिक भर आहे. कांबळे बंधू स्वतः व्यवसायातील बहुतांश कामे करतात. केवळ एक व्यक्ती पूर्णवेळ कामासाठी ठेवली आहे तसेच शेळ्यांसाठी मेथी घास, दशरथ घास, नेपिअर गवत यांची लागवड आहे. शेळ्यांना मुक्त वातावरणात चरण्यासाठी सोडले जात असते. त्यासाठी व्यक्तीची नियुक्ती केली असून, तो दररोज शेळ्यांना चरायला नेतो आणि त्यामुळे शेळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
विक्री व उलाढाल
कोंबड्याचा दर वजन व गुणवत्तेनुसार ६०० ते १००० रुपये प्रति नग, तर अंड्याचा १५ रुपये प्रति नग दर आहे … दररोज २० ते कमाल ४० पर्यंत अंड्यांची थेट विक्री होते तसेच बोकडा विक्रीचा दर ३७० ते ४०० रुपये प्रति किलो आहे. सन २०२२-२३ मध्ये ५० हून अधिक शेळ्या- बोकडांची विक्री केली सन २०१९-२० मध्ये शेळीपालन व कोंबडीपालनातून एकूण ३ लाख ६० हजार रुपये उलाढाल केली आहे. त्यापुढील वर्षांत अनुक्रमे ही उलाढाल पाच लाख ७० हजार रु. व सात ७ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
ग्राहक बाजारपेठ तयार केली
शुभम यांच्या व्यवसायातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांचे नेटवर्क त्यांनी बळकट केले आहे त्यांनी ली. अकोला शहरात ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या ग्राहकांना व्हिजिटिंग कार्ड द्यायला सुरुवात केली. दवाखान्यांमध्ये डॉक्टरांना भेटून गावरान अंड्यांचे महत्त्व याविषयी ‘प्रमोशन’ केले आणि अंड्यांमधील प्रथिनांचे प्रमाण प्रयोगशाळेतून तपासून घेतले. ग्राहकांकडून विचारणा येऊ लागल्यानंतर अंडी घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली आहे. शेळ्या- बोकडांचीही बचत गट, लघुउद्योग, महिला बचत गटांना थेट विक्री सुरू केली आणि एखाद्या ग्राहकास पांढरा बोकड हवा असल्यास बाजारपेठेतून तोही पुरविण्याची व्यवस्था केली. अशा रीतीने ग्राहकांचा विश्वास व तत्पर सेवा देणे यातूनच व्यवसायाची वृद्धी करणे शक्य झाले.
उल्लेखनीय बाबी
-भाडेतत्त्वावरील शेतात सोयाबीन, गहू आणि गेल्या वर्षी एकरी १२ क्विंटलपर्यंत सोयाबीन उतारा.
-उत्पादित गव्हाची चाळणीद्वारे स्वच्छता करून ३४ रुपये प्रति किलो दराने ३० किलोच्या बॅगेमधून थेट ग्राहकांना विक्री केली आणि सोबतीला कंपोस्ट खत निर्मिती व विक्रीही.
-मागील वर्षी शुभम यांनी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत अकोट क्षेत्रातील पुर्नवसित आदिवासींना मदत केली आणि यात पोल्ट्रीतील पक्षी, खुराडे, पाणी, खाद्य, मल्टी व्हिटॅमिन औषधे, लिव्हर टॉनिक आदी सव्वा दोन लाख रुपये किमतीच्या घटकांचा पुरवठा. आदिवासींकडून अंडी घेऊन त्यांचे मार्केटिंग करण्याचा विचार आहे.
-शुभम यांनी ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’तर्फे शेळी व्यवसायाचे सोलापूर येथे प्रशिक्षण घेतले आहे.
-आता मार्गदर्शक म्हणूनही तयारी आहे.
-स्वतःचे शेत घेणे, कांदा चाळ, गांडूळ खत निर्मिती, बटेर व ससेपालन करण्याचा पुढील मानस आहे.