Government decision grants: शासन निर्णय अनुदान यांनाच मिळणार क्विंटलमागे 350 रुपये कांदा अनुदान - डिजिटल शेतकरी

Government decision grants: शासन निर्णय अनुदान यांनाच मिळणार क्विंटलमागे 350 रुपये कांदा अनुदान

Government decision grants : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्यानुसार राज्यातील कांदा उत्पादकांना क्विंटलमागे ३५० रुपयांचे अनुदान देण्याचा शासन निर्णय सोमवारी सहकार व पणन विभागाने काढला आहे. तसेच २०० क्विंटलपर्यंत हे अनुदान दिले जाईल.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खासगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन परवानाधारकांकडे वा नाफेडकडे १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे. मुंबई  कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविली जात आहे. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे.Government decision grants

हे हि वाचा : 🌶️लाल मिरचीला दराचा ठसका

परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू नसेल तसेच ज्या प्रकरणात सातबारा उतारा वडिलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबीयांच्या नावे आहे व सातबारा उताऱ्यावर पीक पाहणीची नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा वा अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने  सातबारा ज्यांच्या नावे असेल त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जाणार आहे.

शेतकऱ्यांनी काय करायचे ?

कांदा विक्री पट्टी / विक्री पावती, सातबाराचा उतारा, आपला बँक बचत खाते क्रमांक यासह साध्या कागदावर बाजार समितीकडे अर्ज करावा लागणार आहे.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

1 thought on “Government decision grants: शासन निर्णय अनुदान यांनाच मिळणार क्विंटलमागे 350 रुपये कांदा अनुदान”

Leave a Comment