Government Scheme: पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध तीन उपअभियानांचा समावेश केला गेला आहे. यात पशुधन व कुक्कुट प्रजाती विकास उपअभियान, पशुखाद्य व वैरण उपअभियान, नावीन्यपूर्ण योजना व विस्तार उपअभियानाचा समावेश केला आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध योजनांकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले गेले आहेGovernment Scheme
1880 पासूनचे जमिनीचे सातबारे फेरफार ऑनलाईन डाऊनलोड करा
पशुधन व कुक्कुट प्रजाती विकास उपअभियानात ग्रामीण कुक्कुटपालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजगता विकासामध्ये कमीत कमी एक हजार अंड्यांवरील कुक्कुट पक्ष्यांचे संगोपन व अंडी उबवणी केंद्राच्या स्थापनेकरिता ५० टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा, एकवेळ ५० टक्के भांडवली अनुदान अधिकतम मर्यादा २५ लाख रुपये प्रति कुक्कुट युनिट केले आहे. ग्रामीण शेळीपालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकासामध्ये कमीत कमी १००, २००, ३००, ४०० किंवा ५०० शेळ्या, मेंढ्या गटाची स्थापना करण्याकरिता ५० टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा, एकवेळ ५० टक्के भांडवली अनुदान १०, २०, ३०, ४० व ५० लाख रुपये याप्रमाणे दोन समान हप्त्यांमध्ये अधिकतम मर्यादा ५० लाख रुपये दिले आहे. वराहपालनाद्वारे उद्योजकता विकासामध्ये १०० मादी आणि २५ नर वराह गटाची स्थापना करण्यासाठी उर्वरित ५० टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा एकवेळ ५० टक्के भांडवली अनुदान २० लाख रुपये दिले आहे.Government Scheme
पशुखाद्य आणि वैरण उपअभियानात गुणवत्तापूर्ण वैरण बियाणे उत्पादनाकरिता अनुदान १०० टक्के मूलभूत बियाणे २५० रुपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान, पायाभूत बियाणे १५० रुपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान, प्रमाणित बियाणे १०० रुपये प्रति किलो उत्पादनासाठी अनुदान देण्यात येत आहे. पशुखाद्य व वैरण उद्योजकतेमध्ये मुरघास बेल, वैरणीच्या विटावी टीएमआर निर्मितीकरिता दोन टप्प्यांमध्ये सीडबीमार्फत अनुदान आणि उर्वरित ५० टक्के बँकेचे कर्ज अथवा लाभार्थी हिस्सा राहणार आहे.Government Scheme
येथे करा अर्ज
योजनेकरिता प्रकल्प अहवाल, सातबारा, बँकेचा रद्द केलेला धनादेश, बँकेचे संमतिपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल, प्रशिक्षण प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, १० टक्के लाभार्थी हिस्सा जमा असल्याचे बँकेचे स्टेटमेंट पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध योजनेकरिता शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपालन, वराहपालन क्षेत्र आणि वैरण विकास करून रोजगार निर्मिती आणि उद्योजगता विकासासाठी पशुपालकांनी राष्ट्रीय पशुधन अभियानामध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी udymimitra.gov.in संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. एस. पाटील यांनी केले गेले आहे.Government Scheme
2 thoughts on “Government Scheme : शेळ्या, मेंढ्या, कुक्कुटपालन, वराहपालन क्षेत्र आणि वैरण 50 % अनुदान अर्ज सुरु 2023 ”