कापसाचे खत नियोजन कसे कराल - डिजिटल शेतकरी

कापसाचे खत नियोजन कसे कराल

कापसाचे खत नियोजन कसे कराल यंदच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीचे प्रमाण वाढ झालेली आहे. मागील हंगामात कापसाचा भाव 13 ते 14 हजार पर्यंत गेलेला पाहायला मिळाला आहे. यामुळे या वर्षी कपाशी लागवडीचे प्रमाण वाढले. पण मागील हंगामात जास्त अतिवृष्टीने कापसाचे अपेक्षित उत्पन्न झाले नव्हते. कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी व्यवस्थापन असणं आवश्यक आहे आणि  वेळोवेळी जे पिकांना आवश्यक असतं ते मिळायला हवं.

यंदा कपाशीचे प्रमाण वाढले जरी असले, तरी पण कापसाचा भाव चांगला राहील असा अंदाज आहे. कापसाची या वर्षी देखील मोठी मागणी असल्याचा अंदाज पाहायला मिळत  आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने कापसाचे अपेक्षित जरी उत्पादन झाले नसेल, तरी पण कापसाला दर चांगला मिळाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला होता. यंदा शेतकरी जास्तीत जास्त कपाशीचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न राहील तसेच काही शेतकर्यांनी कपाशी देखील लावली आहे.

जास्त उत्पादन घेण्यासाठी योग्य पद्धतीने कपाशीचे व्यवस्थापन झालं पाहिजे आणि यासाठी शेतकऱ्यांनी कपाशीच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. आणि  यामध्ये खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे व  कापसाचे खत व्यवस्थापन कसे करावे हे या लेखात आपण आज पाहणार आहोत.

कापसाचे खत व्यवस्थापन

कपाशीला एकरी 100-११०  किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 50 किलो पालाश शिफारस केली गेलेली आहे. परंतु, त्यासोबत कापूस तेलवर्गीय पीक असल्याने, कापसाला गंधक (Sulphur) या दुय्यम अन्नद्रव्याची NPK सोबत गरज आहे. नेहमी कापूस आणि सोयाबीनचे पिके घेतल्यामुळे जमिनीतील गंधक कमी झालेले असते, त्यासाठी रासायनिक गंधक खत देणे फार गरजेचं आहे.

 

हे हि वाचा :बी. टी. कापूसा ची लागवड कशी शेतकरी बांधवांसाठी विशेष माहिती 2022

 

लागवडी नंतर पहिले खताचे व्यवस्थापन

कपाशी लागवडीच्या 2५  ते 30 दिवसाच्या दरम्यान खत देणे आवश्यक आहे. यामध्ये आपण एकरी एक बॅग 10:26:26+ 10 किलो गंधक किंवा एकरी एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट (दाणेदार) 25-३०  किलो नत्र+ 25 किलो पोटॅश किंवा एकरी एक बॅग 20:20:0:13 किलो पोटॅश देवू शकता.

दुसरे खताचे व्यवस्थापन

कपाशी लागवडीच्या ३६  ते 50 दिवसाच्या दरम्यान एकरी एक बॅग डीएपी + 25 किलो पोटॅश + सुक्ष्म अन्नद्रव्ये 10-१२  किलो असे खताचे व्यवस्थापन करावे.

तिसरे खताचे व्यवस्थापन

कपाशी लागवडीनंतर 65-७०  व्या दिवशी एकरी दाणेदार एक बॅग + एक युरिया बॅग + 25-३०  किलो मॅग्नेशियम सल्फेट असे खत व्यवस्थापन करावे.

चौथे खत व्यवस्थापन

कपाशी लागवडीच्या ८५-९०  दिवसांनंतर कपाशीला नत्राची गरज असल्यामुळे एकरी एक युरिया खत दिले पाहिजे.

अशाप्रकारे शेतकरी कापसाचे खत व्यवस्थापन करू शकता आणि  यामुळे कपाशीच्या उत्पादनात वाढ HIO १०० % होईल. आपण पुढील लेखात कापूस रोग नियोजन पाहणार आहोत.

cotton

 

Leave a Comment