नवी दिल्ली : देशभरात विविध ठिकाणी आयकर विभागाची (Income tax department) कारवाई सुरु झाली आहे. आज राजकीय फंडिंग प्रकरणी आयकर विभागाकडून देशभरात 50 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे माहिती सांगण्यात येत आहे. दिल्लीपासून उत्तराखंड आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये आयकर विभागाची पथके पोहोचली आहेत आणि करचुकवेगिरीप्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक आयकर(Income Tax) रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि जयपूरमध्येही व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत.
राजस्थानमध्ये माध्यान्ह भोजनातून कमाई करणाऱ्यांवर आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये गृह राज्यमंत्री असलेल्या राजेंद्र यादव आणि मिड डे मील बिझनेस ग्रुपवर आयकर विभागाने छापेमारी केली गेली आहे. मंत्री राजेंद्र यादव यांचा कोतपुतळी येथे पोषण आगार कारखाना आहे आणि दरम्यान, आतापर्यंत आयकर विभागाची पथके 50 हून अधिक ठिकाणी पोहोचली आहेत.
या छापेमारीत 300 हून अधिक पोलिसांचा सहभाग आहे तसेच आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये 100 वाहनेही वापरली जात आहेत. जयपूर जिल्ह्यातील कोतपुतळी इथेही छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या जवानांनाही सोबत घेतले जात आहे. राजस्थानसोबतच दिल्ली, महाराष्ट्र, उत्तराखंडमध्येही छापेमारी सुरु झाली आहे.
बंगळुरू-मुंबईतही छापेमारी
बंगळुरूमध्येही आयकर विभागाच्या छाप्यांची माहिती समोर आली आहे आणि मणिपाल ग्रुपवरही आयकर विभागाने छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळुरूमध्ये 20 हून अधिक ठिकाणी आयकर विभागाचा शोध सुरू आहे, तसेच सर्वांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. मिड डे मिल घोटाळा प्रकरणी मुंबईतही आयकर विभागाचे छापे सुरू झाले आहेत. येथे आयकर विभागाची पथके 4-5 ठिकाणी छापे टाकतणे सुरु आहेत. आयकर विभागाला काही विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर छापे टाकण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले जात आहे.
हे हि वाचा : लाल मिरचीच्या दरातील तेजी टिकून
जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.