Insurance protection: आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी केलेली आहे आणि आता या वारकऱ्यांना विमा संरक्षणाची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच वारकऱ्यांना तीस दिवसांसाठी हे विमा संरक्षण दिले जाणार आहे.(Insurance protection)
वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात, वारीमध्ये वाहन घुसणे अशा दुर्घटना अनेकदा होत असतात. या घटनांना विमा संरक्षण मिळणार आहे आणि यासाठी शासनाने विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू केली आहे. याचा जीआरही देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे आणि तसेच कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास एक लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये देखील देण्यात येणार आहेत. तसेच वारीदरम्यान कोणी आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च दिला जाणार आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.(Insurance protection)
या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा… pic.twitter.com/RMx10WmTXt
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 21, 2023
तसेच आषाढ एकादशी २९ जून २०२३ रोजी आहे आणि ह्या निमित्ताने पंढरपूर शहरामध्ये भरणारी आषाढी यात्रा २२ जून ते ६ जुलै या कालावधीत होणार आहे. पंढरपूर आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. राज्यासह अन्य राज्यातील भाविकांची गर्दी पंढरपुरात होते आणि आलेल्या सर्व भाविकांची सोय व सेवासुविधा पुरविण्यासाठी विविध पातळीवर जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.
gr8 thought, gr8 Job,