Katraj Milk: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (कात्रज डेअरी) जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर १ रुपयाचा फरक दिला जाणार आहे तसेच ‘कात्रज डेअरी’च्या बुधवारी (ता. २७) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.Katraj Milk
हा फरक येत्या दिवाळीपूर्वी वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा कात्रज डेअरीचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी या वेळी बोलताना केली आहे. कात्रज डेअरीला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे आणि हा नफा होण्यामागे कात्रज डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे.

त्यामुळे या शेतकऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून एक रुपयाचा फरक देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला गेला आहे. या फरकापोटी ६ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप केले जाणार आहे आणि संघाचे अध्यक्ष पासलकर यांनी या सभेत दूध संघाच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा जाहीर केला.
शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय ! आता शेतकऱ्यांना खतांवरही मिळणार १०० टक्के अनुदान
या वेळी दूध उत्पादकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत, त्यांच्या शंकांचे निरसन केले आहे. तसेच जिल्ह्यातील १६ दूध संस्थांना आदर्श दूध संस्था पुरस्कार, तर पशुखाद्याची सर्वाधिक विक्री करणाऱ्या ३ दूध संस्थांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
प्रत्येकी रोख ११ हजार रुपये, प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे आणि या सभेला दूध संघाचे आजी, माजी संचालक, दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष भाऊ देवाडे यांनी यावेळी आभार मानले.