Labor Shortage : शेतीची मशागत करण्यासाठी लागणाऱ्या मजुरांच्या दरात साधारण २० टक्क्यांनी यंदा वाढ झालीली दिसत आहे.
शेतीची मशागत करण्यासाठी लागणाऱ्या मजुरांच्या दरात साधारण २० टक्क्यांनी यंदा वाढ झाली आहे आणि मजुर टंचाई आणि मागणी अधिक यामुळे मजुरीचे दर वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे मजुरीत वाढ झाली आहे आणि यांत्रिक शेती करताना इंधनाचे वाढते दरही परवडणारे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झालीली आहेLabor Shortage
नगर जिल्ह्यासह राज्याच्या बहुतांश भागात अलीकडच्या काही दिवसापासून मजुरांच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळी खरिपात साधारण बाजरी, खरीप ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, कापूस, सोयाबीन, यासह उसाचीही लागवड होत असते.Labor Shortage
अपवाद वगळता राज्यातील काही भागात यंदा मॉन्सूनचा पाऊस उशिराने झाला आणि त्यामुळे यंदा पेरण्याला साधारणपणे १५ दिवस उशीर झाला. सध्या खरिपात प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, बाजरी, कापूस, सोयाबीनचे पीक आहे.
चांगल्या पावसामुळे ३१ जुलैअखेर १२३ लाख हेक्टरच्या पुढे खरीप पेरा झाला आहे तसेच उशिराने पेरण्या, कापूस लागवड झाली असली तरी आता पिके वाढीच्या स्थितीत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खुरपणी, कोळपणी, खत टाकणी यासह इतर शेती मशागतीची कामे उरकण्याची सध्य लगबग सरू आहे.
दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने सर्वच ठिकाणी एकाचवेळी कामे आलेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अलीकडे अनेक शेतकरी यंत्रिकीकरणाचा वापर करत असले तरी यंत्रासाठी लागणाऱ्या इंधनाचे वाढते दरही परवडणारे शेतकर्याला नाहीत.Labor Shortage
काही कामे केवळ मजुरानेच करावी लागतात आणि मात्र मजुरीचे वाढते दर आणि त्यांच्या टंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अन्य भागांतून जादा मजुरी देऊन मजूर आणावे लागतात तसेच त्यांच्या जाण्या-येण्यासाठीचा खर्च शेतकऱ्यांना वेगळा करावा लागत आहे. खास करून सोयाबीन, कापूसपट्ट्यात मजुरीबाबत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत.
…असे आहेत दर (रुपयांत) (कंसात पूर्वीचे दर)
– पुरुष मजूर ः ५०० ते ६०० (३०० ते ४००)
– महिला मजूर ः ३०० ते ३५० (२०० ते २५०)
– फवारणी ः ४०० (२५० ते ३००)
– बैल मशागत ः ७०० एकरी (४५० एकरी)
– टॅक्टर मशागत ः १८०० एकरी (१५०० एकरी)
भूमिहीन लाख जर महिन्याला जर ३००० रू दिले तर मजूर कशालाच काम करतील