Land Information: जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे पहा आपल्या मोबाईल वर 2022 - डिजिटल शेतकरी

Land Information: जमिनीचे सरकारी भाव कसे ठरतात अन् कुठे पहायचे पहा आपल्या मोबाईल वर 2022

Land Information: काळाच्या ओघात शेत जमिनीचे दर झपाट्याने वाढत आहेत आणि असे असले तरी नागरिक हे (Farm land) शेत जमिनीतच अधिकचा पैसा गुंतवत आहेत.

एक स्थावर मालमत्ता म्हणून शेत जमिनीचे महत्व वाढत आहे तसेच शेत जमिन विकत घेतली म्हणजे शेती करावीच असे नाही तर आपला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक व्हावा यामागची भूमिका असते. शिवाय शेत जमिन असणे आजही प्रतिष्ठेचे मानले जात असते. पण शेत जमिन विकत घेण्यासाठी त्या भागातील जमिनीचे सरकारी दर काय आहेत? (government rates) याची माहिती बऱ्याच जणांना नसते शिवाय त्याची आवश्यकता नाही असा अनेकांचा गैरसमज असतो.

पण जर शासकिय दराची माहिती असली तर जमिनचा दर्जा, त्या परिसरातील भौगोलिक परस्थितीचा अंदाज बांधता येत ( Land Information)असतो. त्यामुळे ज्या ठिकाणची (importance of land) जमिनीची खरेदी करायची आहे त्या भागातील सरकारी दर काय आहेत याची माहिती कशी मिळवायची याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

सर्वकाही डिजिटल

आता जमाना बदलला आहे सर्वकाही डिजिटल होत आहे. शिवाय शेती ( Land Information)संबंधीची माहिती ही ऑनलाईन मिळावी हे तर सरकारचेच धोरण आहे आणि ज्याप्रमाणे 7/12, 8 अ हे ऑनलाईनद्वारे काढले जात आहेत. त्याचप्रमाणे शेतजमिनीचे सरकारी दरही काय आहेत याची माहिती मिळणार आहे आणि त्यामुळे खरेदी करणाऱ्याची फसवणूक होत नाही शिवाय त्या भागातील शेतजमिनीचा अंदाजही बांधता येणार आहे.

अशी आहे प्रक्रिया

जमिनीचे सरकारी दर पाहण्यासाठी सर्व प्रथम Google वेबसाईटवर जाऊन तिथे असलेल्या सर्चबार मध्ये igrmaharashtra.gov.in असे टाईप करावे लागणार आहे.  त्यानंतर मात्र, आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाची नोंदणी आणि मुद्रांक विभागाची वेबसाईट सुरु होईल आणि या पेजच्या डाव्या कोपऱ्यात वेगवेगळे तीन मुद्द्यांचे टॅप दिसणार आहे. यापैकी महत्त्वाचे दुवे असा लिहलेली टॅब दिसेल त्यावर क्लिक करा मग आपल्यासमोर बरेचशे पर्याय दिसतील आणि त्यापैकी मिळकत मूल्यांकन ह्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर बाजारमुल्य दर पत्रक नावाचे पेज ओपन सोमर होईल.

या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला ज्या जमिनीचा सरकारी भाव पाहयचा आहे आणि तो जिल्हा निवडा. कोणत्या वर्षामध्ये किती भाव होता या पर्यावर क्लिक करुन आपल्याला कोणत्या वर्षात काय भाव होता याची देखील माहिती आपणास होणार आहे.  यानंतर आपल्याला ज्या भागात जमिन खरेदी करायची आहे त्या गावचा जिल्हा, तालुका निवडायचा, त्यानंतर गाव निवडल्यानंतर आपल्याला त्या गावातील शेतजमिनीचे किंवा जागेचे भावही समोर दिसणार आहेत. यामध्ये संबंधिताला जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीचा सरकारी भाव काय आहे याची माहिती समोर पाहता येईल. यामध्ये जे भाव दिलेले असतात ते हेक्टरमध्ये असतात आणि त्यानुसार एकरी काय भाव आहे याचा अंदाज बांधता येणार आहे.

जमिनीनुसार ठरतात दर

वरील प्रक्रियेत जमिनीचे सरकारी दर काय असतात याची तर माहिती( Land Information) मिळेलच पण जिरायत जमिन, बागायती जमिन तसेच एमआयडीसी अंतर्गत येणारी जमिन, राष्ट्रीय महामार्गालगत येणारी जमिन त्यानुसार त्याचे दर हे ठरविण्यात येत असतात. आणि यामुळे सध्याचे मुल्य आणि सरकारी दर काय याची माहिती झाली तर जमिनीचे नेमके भाव काय राहणार याचा अंदाज बांधता येणार आहे.

हे हि वाचा : शेतीचा बांध कोरल्यावर होणार फौजदारी गुन्हा दाखल

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇