Leptospyrosis Disease: Animal Care : पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेले असते आणि अशा पावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. हा आजार सर्व पाळीव प्राणी तसेच जनावरांपासून संसर्ग होऊन माणसांमध्ये देखील होत असतो. यासाठी सार्वजनिक ठिकाणे, गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी लागते.(Leptospyrosis Disease)
जनावरांची जंतुयुक्त लघवी, गर्भाशयातील स्त्राव हे गटारातील पाणी, सांडपाणी, पुराचे रस्त्या साठलेल्या पाण्यात मिसळतात, आणि यातून लेप्टोस्पायरोसिस आजाराचा प्रसार होत असतो.गोठ्यात अयोग्य व्यवस्थापन असल्यास पाणी, चारा, खाद्यपदार्थ यांचा मलमूत्राशी संपर्क आल्यामुळे ते दूषित होत असते. पावसाळी वातावरणात लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत असतो.
हा आजार सर्व पाळीव प्राणी, तसेच जनावरांपासून संसर्ग होऊन माणसांमध्ये देखील होत आहे आणि म्हणून या आजारास प्राणी संक्रमक आधार म्हणतात.खूप पाऊस पडणाऱ्या, पाणथळ, सखल भागात जेथे पाणी साठून राहते तसेच अल्कलीयुक्त क्षारयुक्त जमिनीच्या प्रदेशात, ज्या ठिकाणी हवेत आर्द्रतेचे जास्त प्रमाण आहे आणि अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.
प्रसार कसा होतो?
जनावरांची लघवी, गर्भाशयातील स्त्राव हे गटारातील पाणी, सांडपाणी, पुराचे रस्त्यावर साठलेल्या पाण्यात मिसळतात, आणि यातून याचा प्रसार होतो.जिवाणू उंदराच्या शरीरात सुप्तावस्थेत असतात तसेच त्यांच्या मलमूत्राद्वारे झपाट्याने प्रसार होतो. हे जिवाणू डोळे, नाकातोंडातून तसेच माणसाच्या त्वचेवरील लहान जखमेतून शरीरात प्रवेश करत असतात.(Leptospyrosis Disease)
हे हि वाचा : डिजिटल स्वाक्षरी असलेले ७/१२ कसा काढायचा
भात शेती, ऊस मळ्यात काम करणारे शेतकरी, साचलेल्या पाण्यात/खाण कामगार, जलवाहिन्या, गटारे, स्वच्छतागृहे यामध्ये काम करणारे मजूर, जनावरांच्या संपर्क येणारे शेतकरी, रोगाने बाधित जनावरांवर उपचार करणारे पशुवैद्यक आणि कत्तलखान्यातील खाटीक यांना या आजाराचा संसर्ग होण्याची फार शक्यता असते. पोहण्याच्या तलावातील पाण्यातून संसर्ग देखील होऊ शकतो आणि गोठ्यातील अयोग्य व्यवस्थापन असल्यास पाणी, चारा, खाद्य पदार्थ यांचा मलमूत्राशी संपर्कात आल्यामुळे दूषितीकरण होते.
प्रतिबंधात्मक उपाय
उंदीर, घुशी यांची संख्या कमी होण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी, गोठा तसेच घरामध्ये स्वच्छता ठेवावी तसेच शरीरावर जखम असल्यास त्वरित उपचार करावेत.पुराच्या ठिकाणी तुंबलेल्या साठलेल्या पाण्यात, पोहण्याच्या तलावातील पाणी जंतुविरहित असल्याची खात्री करूनच प्रवेश करावा आणि पावसाळ्यात दूषित पाण्यातून अनेक साथीचे आजार पसरतात तसेच पाणी उकळून गाळून प्यावे. कुत्र्यांसाठी सेव्हन इन वन ही लस उपलब्ध असून ती दरवर्षी टोचून घेतली पाहिजे.
गायी, म्हैशीतील आजाराची लक्षणे
शरीरात जिवाणूंचा प्रवेश झाल्यानंतर ते रक्तात मिसळतात, वाढतात व सेफ्टीसेमिया होत असतो.
गाई, म्हशींमध्ये गर्भपात आणि दुधात रक्त आढळून येते तसेच वासरांमध्ये आजाराचे प्रमाण ७० टक्के असते. गाई-म्हशींमध्ये मृत्यूचे प्रमाण ५ टक्के इतके असते.
मानसातील लक्षणे
१०४ ते १०५ अंश फॅरानाइट ताप येत असतो. डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या होतात, डोळे लाल होत असतात. अंगावर पुरळ दिसत असते.
लसिकाग्रंथी, टॉन्सिल, प्लिहा, यकृत यांना सूज येते, आकार मोठा होतो आणि कावीळ दिसू लागते, रुग्णाला खोकला येतो. धाप लागते, थुंकीतून रक्त पडते.
दातखीळ बसते, रुग्ण बेशुद्ध होतो तसेच यकृत व मूत्रपिंडाचे कार्य बिघडते.
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
डिजिटल शेतकरी वर जाहिरात करण्यासाठी संपर्क 7972054779