license nursery: शेतीला जोडव्यावसाय म्हणून रोपवाटिका चांगला पर्याय..
तुम्हालाही शेतीला पूरक जोड व्यवसाय करायचा आहे का? चांगल्या उत्पन्नाचा स्त्रोत म्हणूनही नर्सरी किंवा रोपवाटिकेचा व्यवसाय चांगला पर्याय ठरू शकत आहे. license nursery
राज्याच्या कृषी क्षेत्रात रोपवाटिका व्यवसाय झपाट्याने वाढताना दिसतो आहे आणि फळे भाजीपाला क्षेत्र विस्तारासाठी हे मोठे क्षेत्र आहे. राज्याच्या काही भागात केवळ दर्जेदार रोप उपलब्ध होत नसल्याने फळ पिकांच्या नव्या लागवडीला खीळ बसली आहे आणि राज्यात फळे व भाजीपाल्याची वाढती मागणी पाहता रोपवाटिका व्यवसायांमध्ये मोठे बदल झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी फलोत्पादक रोपवाटिकेच्या माध्यमातून यशस्वी होताना दिसत आहेत तसेच महाराष्ट्रासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात सफरचंदाची ही लागवड करता येऊ शकते. नुकतेच सोलापुरातील एका शेतकऱ्याने हे करूनही दाखवलं आहे आणि याशिवाय फुलंब्रीतील एका शेतकऱ्याला रोपवाटिकेतून राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे ताजे उदाहरण आहेच. त्यामुळे रोपवाटिका हा चांगल्या उत्पन्नाचा चांगला मार्ग ठरू शकत असतो. license nursery
जगभरातील अनेक युवक चांगला उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून रोपवाटिका व्यवसायाकडे वळले आहेत तसेच अलीकडच्या काळात बहुतेक देशांमध्ये रोपवाटिका व्यवसाय झपाट्याने विकसित झाला आहे.
महाराष्ट्रात रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे तसेच यासाठी महाराष्ट्र रोपवाटिका अधिनियम 1976 द्वारे या उद्योगांचे नियमन व विकास करणारा कायदा आहे. महाराष्ट्र रोपवाटिका कायद्याअंतर्गत राज्यात कार्यरत असणाऱ्या सर्व रोपवाटिकांना किंवा नव्याने रोपवाटिका सुरू करू इच्छा असणाऱ्यांना कृषी विभागाकडून हा परवाना घेणे बंधनकारक ठरत आहे .
परवाना मिळण्यासाठी काय आहे प्रक्रिया?
तुम्हाला जर रोपवाटिका सुरू करण्यासाठी परवाना घ्यायचा असेल तर वैयक्तिकरित्या कलम किंवा रोपे विकण्यासाठी अर्ज करावा लागत असतो.
तुम्ही कलम किंवा रोप कुठे विकणार आहात ते अधिकार क्षेत्र निश्चित करून संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागतो.
त्यानंतर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे फी भरल्यानंतर तो अर्ज कृषी विभागाकडे जमा करावे.
ऑनलाइनही करता येईल नोंदणी
अर्जाची प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेही करता येऊ सोपे आहे.
आपले सरकार https://aaplesarkar.mahaonline.gov.in/enपोर्टल द्वारे ऑनलाईन कलमे किंवा रोपे विकण्यासाठी मिळणाऱ्या परवानासाठी अर्ज करता येतो.
या संकेतस्थळावर कलम किंवा रोपे विकण्याचा परवाना अर्जासाठी ‘ऑनलाइन प्लांट नर्सरी रजिस्ट्रेशन’ ‘ऑनलाइन अर्ज करा’ या बटनावर क्लिक करावे लागेल लागते.
त्यानंतर ‘नवीन वापरकर्ता नोंदणी’ new registration करावे लागेल.
आवश्यक माहितीसह नोंदणी फॉर्म भरा आणि यानंतर पोर्टलवर लॉगिन करून तुम्हाला कलम किंवा रोपे विकण्याच्या परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल .
डाव्या बाजूला असणाऱ्या मेन्यू वरून ‘ agriculture हा पर्याय निवडावा लागतो.
यानंतर कृषी विभागाचे संकेतस्थळ उघडले जाईल आणि यात असलेल्या पर्यायांपैकी हॉर्टिकल्चर हा पर्याय निवडा. व त्यात नर्सरी लायसन्स नावाच्या पर्यायावर क्लिक करावे.
यानंतर online plant nursery registration असा फॉर्म उघडला जाईल आणि हा फॉर्म योग्यरीत्या भरून कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावे license nursery
ऑनलाइन पेमेंट पद्धतीने परवान्यासाठी आवश्यक शुल्क भरा आणि तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन आणि मंजुरी झाल्यानंतर तुम्हाला कलम किंवा रोपे विकण्याचा परवाना मिळेल. license nursery