जोरदार राडा! शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले; अमोल मिटकरीं आणि  महेश शिंदे यांची जोरदार धक्काबुक्की 2022 - डिजिटल शेतकरी

जोरदार राडा! शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले; अमोल मिटकरीं आणि  महेश शिंदे यांची जोरदार धक्काबुक्की 2022

मुंबई -(शिंदे गट) विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी आणि आंदोलने याआधीही केली जात होती मात्र  विरोधक आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर येण्याआधीच शिंदे गट तील आमदारांनी त्याठिकाणी येऊन विरोधकांविरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदार विधानसभेच्या पायऱ्यांजवळ येताच त्यांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली होती. त्यानंतर दोन्ही शिंदे गट आणि राष्ट्रवादी आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाजी सुरु झाली. पुढे याचं रुपांतर धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यातही झालं आहे.

शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी एकमेकांना भिडले होते. यावेळी दोन्ही गटात जोरदार धक्काबुक्कीही झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, प्रताप सरनाईक, शहाजी बापू पाटील यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना बाजुला करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर मिटकरी यांनी शिवसेनेच्या आमदारांवर गंभीर आरोप केला जात आहे. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी धक्काबुक्की केली, घाणेरडी शिवीगाळ केली, असे ते म्हणाले आहे. तसेच यानंतर मिटकरींनी शिंदे यांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली गेली आहे.

“शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली”

शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. यामुळे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गोंधळ उडाला होता. अखेर अजित पवार आले आणि आम्हाला बाजुला होऊया म्हणाले कि  त्यामुळे आम्ही बाजुला झालो असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं जात आहे. तसेच पन्नास खोके एकदम ओके हा नारा दिल्याने शिंदे गटातील आमदारांना झोंबल्याने त्यानी हे कृत्य केले गेले आहे. आम्ही त्यांना डिवचले नाही त्यांनीच आम्हाला डिवचले आहे आणि  धक्काबुक्की करणारे आमदार कोण होते त्यांना मी ओळखत नाही. आम्हाला अजितदादा पवार यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बोलावले होते त्यानुसार आम्ही आंदोलनासाठी आलो होते  आणि  परंतु जे काही अशोभनीय वर्तन केले आहे ते संविधानाला धरून नाही असं मिटकरींनी म्हटलं जात  आहे

 व्हीडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

“अंगावर आलात तर शिंगावर घेऊ”

“महाविकास आघाडीच्या आमदारांनी गेल्या काही दिवसांपासून विधीमंडळाच्या पाऱ्यांवर रोज आंदोलन केली जात आहे.आम्ही आज केले आणि  आम्ही १७० आहोत, ते ९९-१००. आम्ही सगळेच आलो असतो तर काय झाले असते. ते आमच्यावर आंदोलन करून आरोप करत होते आणि  तेव्हा आम्ही बाजुने जात होतो आम्ही  त्यांना उत्तरही देत नव्हतो. आज आम्ही पहिले तिथे होतो अन त्यांचा इतिहास काढत होतो. ते त्यांना झोंबले आहे. आमच्या आडवे आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ आणि  आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ”, असं शिंदे गटातील आमदार भरत गोगावले म्हणाले आहे.

हे हि वाचा : डाळिंबाची लाली उतरली पहा काय भाव असतील गणेशोत्सवात डाळिंबाचे दर वाढणार का

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment