पावसाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन तसेच कोंबडी खाद्यामधील घटक आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
1) पावसाळी वातावरणामुळे कोंबड्यांना आजार होत असतात.
2) कोंबडी पोल्ट्री शेडवरील पत्रे मजबूत बांधून घ्यावेत, जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी ते हलणार नाहीत, उडून जाणार नाहीत याची काळजी घावी.
3) पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल, गवत काढून टाकावे स्वच्छ करावे तसेच परिसरातील जागा स्वच्छ ठेवावी. पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून आजूबाजूचे खड्डे बुजवून घ्यावेत. पाणी वाहून जाण्यासाठी शेडच्या बाजूने चर हा खोदला जावा.
4) कोंबडी पावसाळ्यामध्ये शक्यतो प्लॅस्टिकचे पडदे वापरले जावे. पडदे शेडच्या बाजूच्या लोखंडी जाळीला दोरीने मजबूत बांधलेले असले पाहिजे. पडद्यांची उघडझाप पावसाप्रमाणे करून घावी. दिवसा पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तर पडदे उघडून ठेवावे आणि पडद्यांची बांधणी ही छताच्या पायापासून ते दीड फूट अंतर सोडून असावी. यामुळे शेडमधील वरील बाजूने शेडमध्ये हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते आणि पक्ष्यांना त्रास होत नाही.
5) कोंबडी पक्ष्यांची गादी (लिटर) दिवसातून किमान एक वेळातरी चांगली खाली-वर हलवून घेतली पाहिजे. ओल्या गादीमुळे शेडमधील वातावरण दूषित होत असते. ओलसर गादीमध्ये रोगजंतूंची वाढ होते, पक्षी रोगास बळी पडण्याची शक्यता जास्त असते. चुकून गादी जास्त प्रमाणात ओली झालेली असेल, तर गादीचा तेवढाच भाग काढून बाहेर टाकावा, त्या ठिकाणी नवीन गादी हि टाकली जावी.
6) गादीतील आर्द्रतेमुळे कॉक्सीडीऑसीस रोगाचे एकपेशीय जंतूंचे प्रमाण वाढत असते. गादीतील आर्द्रता कमी करण्यासाठी शिफारशीनुसार चुना मिसळ असतात. शेडमध्ये माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेण्यात यावी.
7) खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी आणि खाद्यांच्या गोण्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गाठी झाल्यास असे खाद्य पक्ष्यांना देऊ नये.
8) कोंबडी खाद्य तपासून घ्यावे आणि पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते. ब्रॉयलर कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिले तर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची प्रमाण असते. कोंबड्यांना द्यावयाच्या पिण्याच्या पाण्यामध्ये शिफारशीत जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसली पाहिजे.
9) पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये म्हणून तिला आतून व बाहेरून रेड ऑक्साईड लावून घेतले पाहिजे आणि भिंत सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून व बाहेरून चुना हा लावावा.
हे हि वाचा :कुक्कुट पालन व्यवसायातुन बेरोजगारांना मिळेल रोजगार 2022
कोंबडी खाद्यामधील घटक
- संतुलित कोंबडी खाद्यातील पौष्टिक तत्त्वांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, चरबी, खनिज पदार्थांचा जास्थ समावेश असतो. आपल्याला कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करावयाचे आहे आणि याचा निश्चित आराखडा तयार केला पाहिजे. कारण कोंबडी खाद्य चिक, ब्रॉयलर व लेयर अशा तीन प्रकारचे असते. कोंबडीच्या खाद्यात वापरावयाचा कच्चा माल कमी खर्चात चांगल्या दर्जाचा मिळेल, याचा प्रयत्न करणे जास्त आवश्यक आहे.
- पोल्ट्री खाद्य तयार करताना किंवा खरेदी करताना काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे, त्यामुळे कुक्कुटखाद्य ताजे व ओलावा कमी असणे कोरडे असणे आवश्यक आहे. खाद्याची गुणवत्ता व रासायनिक चाचणी प्रयोग शाळेत तपासता येत असते.
- कोंबडी खाद्य सूत्र तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत; परंतु हिट अँड ट्रायल पद्धत कुक्कुटखाद्य सूत्र तयार करण्याची सर्वांत सोपी पद्धत आहे. खाद्य सूत्र तयार करताना आपण कोणकोणती धान्ये मिसळून खाद्य तयार करणार आहोत, हे निश्चित करावे आवश्यक लागते. त्यानंतर खाद्यामध्ये आवश्यक ती पौष्टिक तत्त्वे, प्रमाणानुसार, तसेच प्रोटिन व ऊर्जा निश्चित केली जात असते. त्यानंतर कॅल्शिअम, फॉस्फरस, मीठ, सूक्ष्म खनिज मिश्रण, जीवनसत्त्वांचे मिश्रण व औषधांचे मिश्रण निश्चित करतात. आणि हे प्रमाण प्रति 150 किंवा 1000 किलोच्या संख्येत निश्चित करतात.
- सर्वप्रथम खाद्यसूत्रात निश्चित केलेल्या पदार्थांचे वजन ग्राइंडरमध्ये दळून घेतात.आणि हे खाद्य कोंबड्यांच्या श्रेणीनुसार जाड-बारीक असे तयार करत असतात. चिक स्टार्टर स्मॅश तयार करावयाचे असेल तर हे खाद्य बारीक असणे फार आवश्यक आहे. मोठ्या कोंबड्यांना थोडे जाडे भरडे खाद्य असले पाहिजे. सूक्ष्म तत्त्व म्हणजे खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, अमिनो आम्ल व औषधांचे मिश्रण एक किलो मका या प्रमाणात घेतले जाते. हे मिश्रण पाच-सहा किलोपासून तर 100 किलो खाद्याच्या प्रमाणात असणे गरजेचे आहे.
- वजन केलेले सर्व साहित्य सुमारे सहा ते दहा मिनिटे मिसळतात, त्यामुळे जीवनसत्त्वे खाद्यात चांगल्या प्रकारे मिसळतात. ज्या कुक्कुटपालकांकडे ग्राइंडर व मिक्सर नाही, ते साफ केलेल्या फरशीयुक्त जमिनीवर खाद्यपदार्थ टाकून ते फावड्याने चांगल्या प्रकारे एकजीव होतील असे मिसळत असतात. हे मिश्रण हातानेही तयार करता येत असते आणि याशिवाय व्हिटॅमिन ए, बी-2, डी-3, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यांचेही योग्य प्रमाण खाद्यात असावे लागते. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने कोंबडी खाद्यनिर्मिती करणे आवश्क असते.
2 thoughts on “पावसाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन तसेच कोंबडी खाद्यामधील घटक 2022”