Marriage Fraud : बनावट नवरीसह सहा जणांच्या टोळीला अटक बाप रे 20 मुलाशी केला विवाह - डिजिटल शेतकरी

Marriage Fraud : बनावट नवरीसह सहा जणांच्या टोळीला अटक बाप रे 20 मुलाशी केला विवाह

Pune News : Marriage Fraud जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील दोन तरुण मुलांशी विवाह करून रोख रक्कम व दागिने घेऊन पसार होणाऱ्या बनावट नवरी मुलीसह सहा जणांच्या टोळीला जुन्नर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली गेली आहे.Marriage Fraud

या मुलीने मागील दीड वर्षात पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील सुमारे २० तरुणांशी विवाह करून आर्थिक फसवणूक केल्याची कबुली बनावट नवरी मुलीने प्राथमिक तपासात दिली माहिती आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

बनावट नवरी जयश्री काळू घोटाळे (वय ३५, रा. मुरंबी शिरजगाव, ता. त्रंबकेश्वर, जि. नाशिक), बनावट मावशी मीरा बंसी विसलकर (वय ३९), तुकाराम भाऊराव मांगते (वय २३, दोघेही रा. अंबुजा वाडी, जि.नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय ४६ रा. बोटा, ता. संगमनेर, जि. नगर), एजंट शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४ रा. कुरकुटेवाडी, बोटा, जि.नगर), बाळू गुलाब सरवदे(वय ४१, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी कोठडी सुनावलेल्या आरोपींची हे नावे आहेत.

या प्रकरणाचा तपास पुढील उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्ही. व्ही. ध्रुवे करत आहेत.

जयश्री हिने अश्विनी रामदास गवारी असे बनावट नाव धारण करून जुन्नर तालुक्यातील खोडद येथील हरीश गायकवाड यांच्याशी २८ मार्च २०२३ रोजी आळंदी येथे विवाह केला आणि हा विवाह जमवण्यासाठी आरोपींनी गायकवाड यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये घेतले.

लग्नानंतर जयश्री धार्मिक विधीसाठी चार ते पाच दिवस सासरी राहिली आणि  त्या नंतर विसलकर ही तिला माहेरी घेऊन गेली. त्या नंतर जयश्री दागिन्यांसह फरार झाली तसेच याच प्रकारे या टोळीने १० मे २०२३ रोजी याच मुलीस संध्या विलास बदादे असे नाव देऊन गुंजाळवाडी (ता.जुन्नर) येथील सागर प्रभाकर वायकर यांच्याशी जुन्नर येथे विवाह केला होता. आरोपींनी त्यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपये घेतले होते.

नोकरी नसलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांची वेळेत लग्न होत नाहीत आणि या समस्येचा फायदा घेऊन या टोळीने बनावट नवरी मुलगी, मावशी, नातेवाईक तयार करून मध्यस्थी मार्फत कमिशन घेऊन विवाह जमवून एकाच मुलीचे वीस तरुणांसोबत विवाह लावून दिले. नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार येताच पोलिसांनी या टोळीला जेरबंद केलेMarriage Fraud.

– पृथ्वीराज ताटे, सहायक पोलिस निरीक्षक

हे हि वाचा : एकाच मुलीचा दोन शेतकरी मुलांसोबत लग्न शेतकरी तरुणांची फसवणूक

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment