milk adulterated : दूध भेसळ प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला 2023 - डिजिटल शेतकरी

milk adulterated : दूध भेसळ प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला 2023

श्रीगोंदा : milk adulterated जिल्ह्यासह राज्यात गाजलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील दूध (milk) भेसळ प्रकरणातील दहा आरोपींचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दूधभेसळी (milk adulterated) सारख्या गंभीर गुन्ह्यात अर्जदारांचा सहभाग असल्याचे प्रथम दर्शनी दिसणारे पुरेसे पुरावे असल्याचे कारण देत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) खंडपीठाने अर्ज फेटाळला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घातक रसायनांचा वापर करून दूध बनवण्याचा गोरख धंदा अन्न व औषध प्रशासनाने उघडकीस आणत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात काष्टी येथील बाळासाहेब बाबुराव पाचपुते याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची व्याप्ती पाहत तपासी अधिकारी समीर अभंग यांनी सखोल तपास करत या प्रकरणात २४ जणांना आरोपी करत चौदा आरोपींना अटक केली होती तसेच तर उर्वरित बाबासाहेब बाबुराव पाचपुते, समीर कमरुद्दीन शेख, शकिर कमरुद्दीन शेख, सतीश उर्फ आबा मधुकर कन्हेरकर, शुभम नवनाथ बोडखे, अजित संपत वागसकर, महेश श्रीकांत मखरे, दीपक मारुती कारंजुळे, सविता वैभव हांडे, दीपक बापू वागसकर या दहा आरोपींनी छत्रपती संभाजीनगर  खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याने त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला गेला होता.

अंतरिम जामिनावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायलयाने या प्रकरणातील अटक आरोपींच्या जबाबाच्या आधारे गुन्ह्यात उपस्थित अर्जदारांचा सहभाग उघड झाला आहे आणि दुधात भेसळ सारख्या गंभीर गुन्ह्यात अर्जदारांचा सहभाग दर्शवण्यासाठी पुरेसा पुरावा असल्याने त्यांना अटकपूर्व जामिनावर वाढ करता येणार नसल्याचे सांगत या दहा आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राज्यात खळबळ माजविणाऱ्या तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणातील दहा आरोपींचा अटकपूर्व जामीना अर्ज फेटाळल्याने हे दहा आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या रडारवर आले असून या आरोपींना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली असल्याने या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले गेले आहे.

हे हि वाचा : राज्यात चारा टंचाईचे सावट गडद, मुरघास खरेदीसाठी शासनाचा हा निर्णय

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment