Monsoon 2023 : ऑगस्ट महिना शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा; हवामान विभागाचा अंदाज जाहीर - डिजिटल शेतकरी

Monsoon 2023 : ऑगस्ट महिना शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा; हवामान विभागाचा अंदाज जाहीर

Monsoon 2023: ऑगस्टमधील पावसाचा अंदाज सोमवारी (ता. ३१) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला आहे.

जून महिन्यात(Monsoon 2023) सरासरीच्या केवळ ५४ टक्के पाऊस पडला होता आणि मात्र जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसाने देशातील दोन महिन्यांची पावसाची सरासरी भरून निघाली होती. माॅन्सूनच्या दुसऱ्या सत्रात पाऊसमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे मात्र ऑगस्ट महिना शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे असे हवामन खात्याचा अंदाज आहे.

आता ऑगस्ट महिन्यात पाऊसमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने वर्तवला आहे तसेच तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरसरीच्या ९४ ते ९९ टक्के पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला गेला आहे.

ऑगस्ट महिना खरिपासाठी महत्वाचा असतो पण ऑगस्टमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज, हवामान विभागाने दिला आहे. ऑगस्ट महिन्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील बहुतांशी भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर राज्याच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.Monsoon 2023

माॅन्सूनच्या महिन्या दोन महिन्यांमध्ये, म्हणजेच जून आणि जुलैमध्ये पावसाची सरासरी भरून निघाली होती. आता उरलेल्या दोन महिन्यांमध्ये देशात ९४ ते ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच पुढील दोन महिन्यांमध्ये पूर्व विदर्भ आणि विदर्भाचा इतर काही भाग, कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकत आहे. पण राज्याच्या इतर भागात पाऊसमान सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला गेला आहे.

यंदा मॉन्सूनचे आगमन खुपच लांबले आणि यातच पूर्व मोसमी पावसाने दडी दिल्याने जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाव्हता. यामुळे जूनमध्ये राज्यात ११३.४ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या अवघा ५४ टक्के पाऊस पडला आहे. मराठवाड्यात ३१ टक्के पाऊस पडला होता  आणि कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाची तूट होती. पण जून महिन्यात देशातील काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे जून आणि जुलै महिन्याची सरासरी भरून निघाली आहे.

महाराष्ट्राचा विचार करता जुलै महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर इतर भागात सरासरीएवढा पाऊस झाला, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आणि देशातील पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तर पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहिला. जुलै महिन्यात दक्षिण द्वीपकल्पात सरासरीपेक्षा सर्वाधिक ४५ टक्के पाऊस झाला आहे. तर मध्य भारतात २२ टक्क्यांनी अधिक पाऊस पडला आहे. मात्र पूर्व आणि ईशान्य भारतातील पाऊस ३२ टक्क्यांनी कमी झाला आहे.Monsoon 2023

जून आणि जुलैचा विचार करता, मध्य भारतात सरासरीपेक्षा १२ टक्क्यांनी जास्त पाऊस पडला आहे. चालू माॅन्सून हंगामात कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस पडल्याच्या घटना जास्त घडल्या आहेत आणि त्यामुळे जून आणि जुलै महिन्यातील पावसाची सरासरी वाढली आहे.

माॅन्सून हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांतील पडलेला पाऊस आणि ऑगस्ट, सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज सोमवारी (ता. ३१) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला आहे. डॉ. महापात्रा म्हणाले, “देशात जूनच्या तुलनेत जुलैमध्ये पावसाचं प्रमाण सरासरी राहिलं. महाराष्ट्राचा विचार करता जुलै महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तसेच तर इतर भागात सरासरीएवढा पाऊस झाला, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. देशातील पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तर पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस राहिला.Monsoon 2023

हे हि वाचा :आता शेती जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा आपल्या मोबाईल वर

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment