Monsoon 2023: राज्याच्या या भागात जोरदार पावसाचा अंदाज - डिजिटल शेतकरी

Monsoon 2023: राज्याच्या या भागात जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon : राज्याच्या काही भागात जोरदार माॅन्सून सरी पडत आहेत आणि तर काही भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दुसरीकडे माॅन्सूनने आज काही प्रगती केली नाही.माॅन्सूनने राजस्थान, पंजाब आणि हरियाना काही भाग व्यापायचा बाकी आहे आणि आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.Monsoon

देशात माॅन्सूनने मागील चार दिवसांमध्ये चांगली प्रगती केली होती तसेच सोमवार्यंत देशातील बहुतांशी भाग व्यापला होता. पोषक हवामान असल्याने माॅन्सूनचा प्रवास वेगाने सुरु होता आणि आज बुधवारी माॅन्सूनने राजस्थानच्या काही भागात प्रगती केली होती.

यंदा माॅन्सूनची वाटचाल रखडत झाली तरी काही भागांमध्ये माॅन्सून यंदा वेळेच्या आधीच पोचला आणि तसेच यंदा पहिल्यांदा माॅन्सून मुंबई आणि दिल्लीमध्ये पोचला. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी सध्या पोषक हवामान आहे व  पुढील दोन दिवसांमध्ये माॅन्सून राजस्थान, हरियाना आणि पंजाबचा उरलेला भाग व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला.

तर महाराष्ट्रातील कोकणात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे आणि तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भात ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडत आहे. तर मराठवड्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, अशी माहिती हवामान विभगााने दिली आहे.हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच तर पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातही बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.Monsoon

हे हि वाचा : पाईप लाईन अनुदान योजना

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment