Monsoon Alert , Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे आणि आज (ता. ७) राज्याच्या विविध भागांत तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे तसेच उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.(Monsoon Alert )
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. मात्र अंतर्गत ओडिशा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत तसेच मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला असून, बिकानेर, गुणा, मंडला, रायपूर, कलिंगापट्टनम ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
हे हि वाचा : कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला; पक्षी थांबे, कामगंध सापळे देतील सुरक्षा
पावसाला पोषक हवामान झाल्याने बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असून, ढगाळ हवामानासह उकाडा वाढत आहे आणि आज (ता. ७) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, तर विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.Monsoon Alert
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.
विजांसह पावसाचा इशारा
नाशिक, नगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.