Monsoon Update : अरबी समुद्रातून अनेक दिवस रेंगाळलेल्या मॉन्सूनची वाटचाल चागली सुरू झाली आहे. शनिवारी (ता. २४) कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मॉन्सूनचे दणक्यात आगमन झाले आहे तसेच पूर्व विदर्भात मॉन्सूनने प्रगती केली असून, अलिबाग, सोलापूर, उदगीर आणि नागपूरपर्यंत मॉन्सूनने धाव घेतली गेली आहे.Monsoon Update
बंगालच्या उपसागरावरील शाखा बळकट झाल्याने पूर्व भारतात मॉन्सूनची घोडदौड सुरू झाली होती. शुक्रवारी (ता. २३) पूर्व विदर्भाच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली तसेच पूर्व आणि दक्षिणेकडील राज्यातही मॉन्सूनची मोठी प्रगती झाली.दरम्यान केरळमध्ये ८ जून रोजी डेरेदाखल झाल्यांनतर ११ जून रोजी मॉन्सूनने कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे तब्बल १३ दिवस पुढील वाटचाल थांबली होती तसेच शनिवारी (ता. २४) अरबी समुद्रावरून मॉन्सूनने पुढे चाल केली.
हे हि वाचा : दुधात भेसळ करणाऱ्यांवर आता ‘मोक्का’; राधाकृष्ण विखे पाटील
शनिवारी (ता. २४) संपूर्ण, कर्नाटक, तेंलंगणा आणि छत्तीसगड, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागासह, विदर्भाचा आणखी काही भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मिर आणि लडाखच्या काही भागात मॉन्सूनने जोरदार धडक दिली आहे.मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा अलिबाग, सोलापूर, उदगीर, नागपूर, मंदळा, सोनभद्र, बक्सर, सिध्दार्थनगर, पंतनगर, बिजनोर, यमुनानगर, उना आणि द्रास पर्यंत असल्याचे हवामान विभागाने म्हटले गेले आहे.
आणि पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भाग, गुजरातचा काही भाग, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाखसह, हरियाणा, चंडीगड, दिल्ली, पूर्व राजस्थान, पंजाबच्या काही भागात सोमवारपर्यंत (ता. २६) मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता वर्तविली आहे.
आज (ता. २५) कोकणात पावसाचा जोर वाढणार असून, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे तसेच मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातही जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाला आहे.Monsoon Update
जोरदार पावसाचा इशारा (आरेंज अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.
वादळी पावसाचा इशारा :
बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर